
या वर्षभरातल्या म्हणजेच २०२१ (Flop Movies Of 2021) मधल्या अशा चित्रपटांची आपण माहिती घेणार आहोत ज्यात चांगली स्टारकास्ट असतानाही चित्रपट फ्लॉप झाले.
सगळ्यांना सध्या २०२२ या आगामी वर्षाचे वेध लागले आहेत. कारण २०२१ हे वर्ष संपत आलं आहे. मात्र वर्षभरात अनेक अशा घडामोडी आहेत ज्याची माहिती तुम्हाला नसेल. या वर्षभरातल्या म्हणजेच २०२१ (Flop Movies Of 2021) मधल्या अशा चित्रपटांची आपण माहिती घेणार आहोत ज्यात चांगली स्टारकास्ट असतानाही चित्रपट फ्लॉप झाले.
बंटी और बबली 2 (Bunty Aur Babli 2)
प्रेक्षक ‘बंटी और बबली २’ ची आतुरतेने वाट बघत होते. मात्र चित्रपट पाहिल्यानंतर लोकांची निराशा झाली. या चित्रपटाचे बजेट ३० कोटी होते. या चित्रपटामध्ये राणी मुखर्जी, सैफ अली खान आणि पंकज त्रिपाठीसारखे चांगले कलाकार होते. तरीही हा चित्रपट फारसा चालला नाही. आयएमडीबीवरही या चित्रपटाला ३.६ इतकीच रेटींग मिळाली.
सरदार का ग्रँडसन(Sardar Ka Grandson)
अर्जून कपूर आणि नीना गुप्ताची मुख्य भूमिका असलेला ‘सरदार का ग्रँडसन’ हा चित्रपट प्रेक्षकांना फारसा आवडला नाही. या चित्रपटाची कथाच लोकांना समजली नाही. या चित्रपटाचे बजेट १५ कोटींचे होते. या चित्रपटाला आयएमडीबीवर फक्त ४.२ इतकी रेटींग मिळाली.
भुज : द प्राइड ऑफ इंडिया (Bhuj : The Pride Of India)
देशभक्तीच्या विषयावरील चित्रपट अनेकदा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतात. मात्र भुज : द प्राइड ऑफ इंडिया’ हा चित्रपट या गोष्टीला अपवाद ठरला. या चित्रपटात अजय देवगण, संजय दत्त, आणि सोनाक्षी सिन्हा असे मोठे कलाकार होते. चित्रपटाचं बजेट ६० कोटींच होतं. या चित्रपटाला आयएनडीबीकडून फक्त ४.८ इतकंच रेटींग मिळालं.
रुही (Roohi)
२०१८ मध्ये रिलीज झालेल्या ‘स्त्री’ चित्रपटाप्रमाणेच ‘रुही’ हा एक हॉरर कॉमेडी मुव्ही होता. राजकुमार राव यात मुख्य भूमिकेत होता. मात्र तरीही रुही प्रेक्षकांना फारशी रुचली नाही. आयएमडीबीने रुहीला ४.३ इतकंच रेटींग दिलं आहे.
थलाइवी(Thalaivi)
कंगना राणावतचा चित्रपट ‘थलाइवी’ बॉक्स ऑफीसवर फारशी जादू दाखवू शकला नाही. कंगनाची या चित्रपटातली भूमिकाही लोकांना आवडली नाही. चित्रपटाचं बजेट ७० कोटींचं होतं. हा चित्रपट फक्त १३- १४ कोटींचीच कमाई करू शकला.
याशिवाय ‘सत्यमेव जयते २’(Satyamev Jayate 2) आणि ‘चेहरे’(Chehre) सारखे चित्रपटही फ्लॉप ठरले. सिनेसृष्टीत हिट आणि फ्लॉपचं चक्र तर सुरुचं असतं. आगामी वर्षात नवे चित्रपट चांगले चालतील आणि सुपरहिट ठरतील अशी आशा करूयात.