madhuri dixit to present aarya webseries recap

माधुरी दीक्षितनं (Madhuri Dixit)तिच्या अभिनयानं आणि अमर्याद सौंदर्यानं लाखो प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. ‘आर्या २’च्या निमित्तानं माधुरीनं पहिल्या सीझनच्या कथनानं (Madhuri Dixit In Aarya Season 1 Recap Video) सर्व चाहत्यांना पहिल्या सीझनमध्ये त्यांनी अनुभवलेल्या उत्सुकतेची पुन्हा एकदा जाणीव करून दिली. ‘आर्या २’ केवळ डिस्ने प्लस हॉटस्टारवर १० डिसेंबरपासून(Aarya Release Date) स्ट्रीम होणार आहे.

    राम माधवानी(Ram Madhvani) दिग्दर्शित ‘आर्या २’ (Aarya 2)लवकरच डिस्ने प्लस हॉटस्टारवर(Disney Plus Hotstar) रिलीज होणार आहे. सुष्मिता सेन(Sushmita Sen) स्टारर या ॲक्शन ड्रामाचा पहिला सीझन सर्वांनाच खूप आवडला होता. पहिल्या सीझनला मिळालेल्या याच यशाच्या बळावर आता दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, त्याचा उत्कंठावर्धक ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. अशातच बॅालिवूडमध्ये धकधक गर्ल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माधुरी दीक्षितचं नावही या वेब सिरीजसोबत जोडलं गेलं आहे. माधुरी दीक्षित (Madhuri Dixt In Aarya Season 1 Recap Video) आर्याच्या पहिल्या सीझनच्या हायलाइट्सकडे पुन्हा घेऊन जातं आहे.

    माधुरीनं तिच्या अभिनयानं आणि अमर्याद सौंदर्यानं लाखो प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. ‘आर्या २’च्या निमित्तानं माधुरीनं पहिल्या सीझनच्या कथनानं सर्व चाहत्यांना पहिल्या सीझनमध्ये त्यांनी अनुभवलेल्या उत्सुकतेची पुन्हा एकदा जाणीव करून दिली. ‘आर्या २’ केवळ डिस्ने प्लस हॉटस्टारवर १० डिसेंबरपासून स्ट्रीम होणार आहे.

    माधुरीसारख्या एव्हरग्रीन अभिनेत्रीनं ‘आर्या’च्या आठवणी जागवल्याचा फायदा निश्चितच ‘आर्या २’ला होणार आहे. पहिल्या सीझनच्या तुलनेत ‘आर्या’च्या दुसऱ्या सीझनमध्ये सुष्मिताचं खूपच वेगळं रूप प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ट्रेलर आल्यापासून आर्यामध्ये पुढे काय घडणार हे जाणून घेण्याचे वेध सर्वांनाच लागले आहेत.