
‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण?’(Maharashtracha Favourite Kon) सुवर्णदशक सोहळ्याच्या निमित्तानं मराठी सिनेसृष्टीतील मागील १० वर्षांचा (10 Year Of Maharashtracha Favourite Kon) आढावा घेत सुवर्णदशक साजरं करण्यात आलं. कलाकारांच्या फोटोशूटवरही दहाचा ठसा (Reflection Of 10 In Celebrity Photoshoot) उमटल्याचं पाहायला मिळालं.
झी टॅाकीजच्या(Zee Talkies) ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण?’(Maharashtracha Favourite Kon) सुवर्णदशक सोहळ्याच्या निमित्तानं मराठी सिनेसृष्टीतील मागील १० वर्षांचा (10 Year Of Maharashtracha Favourite Kon) आढावा घेत सुवर्णदशक साजरं करण्यात आलं. सुवर्णदशक असल्यानं आपोआपच या सोहळ्यात १० या आकड्याला अनन्यसाधारण महत्त्व आलं होतं. या निमित्तानं गेल्या दहा वर्षातील विजेत्यांना नामांकन देण्यात आलं होतं, तसेच कलाकारांच्या फोटोशूटवरही दहाचा ठसा (Reflection Of 10 In Celebrity Photoshoot) उमटल्याचं पाहायला मिळालं.
‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण?’ सुवर्णदशक सोहळा ब्लॅक अँड गोल्ड थीमसोबत संपन्न करण्यात आला आणि त्याचीच झळाळी सेलिब्रिटी फोटोशूटमध्येही पहायला मिळत आहे. यासाठी १० हा आकडा असलेल्या ट्रॉफीची अशी छायारचना करून वेगळा आणि सुंदर परिणाम साधण्यात आला आहे. जेणेकरून १० हा आकडा हायलाईट होऊ शकेल.
सोहळा दशकाधीशांच्या सन्मानाचा, सोहळा महाराष्ट्राच्या पसंतीचा!
‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण?’ सुवर्णदशक सोहळा – रविवार, दि. २६ डिसेंबर रोजी संध्या. ६ वाजता फक्त आपल्या #ZeeTalkies वर#MFK #SuvarnaDashak pic.twitter.com/rIVaESwCnq
— Zee Talkies (@ZeeTalkies) December 15, 2021
महेश मांजरेकर, सचिन पिळगावकर, नागराज मंजुळे, रितेश देशमुख, संगीतकार अजय-अतुल, मृणाल कुलकर्णी, संजय जाधव, स्वप्नील जोशी, सई ताम्हणकर, सिद्धार्थ जाधव, प्रवीण तरडे, अंकुश चौधरी, सोनाली कुलकर्णी, अमृता खानविलकर, वैदेही परशुरामी, आकाश ठोसर, ललित प्रभाकर, तेजस्वीनी पंडीत, पूजा सावंत, क्रांती रेडकर, आर्या आंबेकर. केतकी माटेगावकर आदी कलाकारांचे ब्लॅक अँड गोल्ड थीममधील फोटो शूट केले आहेत. सुवर्णदशकाचं औचित्य साधत करण्यात आलेल्या या फोटोशूटसह सर्वच ठिकाणी १० हा आकडा अधोरेखित करण्यात आला.