‘झुंड’चं मेकिंग आणि बरंच काही

यामध्ये नागराज चित्रपटातील सुरुवातीचा सीन समजावून सांगताना दिसतात. सेटवर अमिताभ बच्चन यांची एण्ट्री, शूटिंग पाहण्यासाठी लोकांची झालेली गर्दी हे सारं काही पाहायला मिळत आहे.

    नागराज मंजुळे यांच्या झुंड सिनेमाची सध्या सर्वत्र चर्चा होते आहे. या सिनेमातून पुन्हा एकदा बिग बी अमिताभ बच्चन यांचा आणखी एक दर्जेदार अभिनय प्रेक्षकांना पाहायला मिळाला. हा सिनेमा करताना या सिनेमाच्या संपूर्ण टीमने अफाट मेहनत घेतली. त्याची एक झलक सध्या झुंडच्या मेकिंगमधून अधिक प्रकर्षणाने पाहायला मिळत आहे.

    झुंडच्या मेकिंगचा हा व्हिडीओ ‘आटपाट प्रॉडक्शन्स’च्या युट्यूब चॅनेलवरून शेअर करण्यात आला आहे. ‘झुंड’चा पडद्यामागचा प्रवास या व्हिडीओत पाहायला मिळतोय. जवळपास दीड मिनिटाच्या या व्हिडीओच्या सुरुवातीला सेटवरील मुलांच्या धमाल-मस्तीपासून होते. यामध्ये नागराज चित्रपटातील सुरुवातीचा सीन समजावून सांगताना दिसतात. सेटवर अमिताभ बच्चन यांची एण्ट्री, शूटिंग पाहण्यासाठी लोकांची झालेली गर्दी. अमिताभ बच्चन आणि नागराज मंजुळे यांची भेट, सिनेमॅटोग्राफर, कॅमेरामन यांना करावी लागलेली मेहनत अशा बऱ्याच गोष्टी या व्हिडीओमध्ये पहायला मिळतात.

    नागपुरातील विजय बारसे यांच्या आयुष्यावर हा चित्रपट आधारीत आहे. 4 मार्चला ‘झुंड’ थिएटरमध्ये रिलीज झाला होता.