
सनी लिओनीच्या (Sunny Leone) ‘मधुबन’ (Madhuban) या गाण्यावरील या डान्सला मथुरा येथील काही संतांनी विरोध (Mathura Priests Protest Against Sunny Leone Dance) करत, तिचा डान्स अश्लिल असल्याचं म्हटलं आहे. यासोबतच सनीच्या गाण्यावर बंदी घालण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
‘मधुबन’ (Madhuban)या गाण्यामुळे सनी लिओनी ( Sunny Leone) चर्चेत आहे. सनीच्या या गाण्याला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला. काहींना सनीचं हे गाणं आवडलं असलं तरी अनेकांनी या गाण्याला विरोध (Controversy Over Sunny Leone Madhuban Song Dance) केल्याचं पाहायला मिळालं. सनीच्या या डान्सला मथुरा येथील काही संतांनी विरोध (Mathura Priests Protest Against Sunny Leone Dance) करत, तिचा डान्स अश्लिल असल्याचं म्हटलं आहे. यासोबतच सनीच्या गाण्यावर बंदी घालण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
सनी लिओनीच्या गाण्यावर मथुरा येथील संतांनी आक्षेप घेतला आहे. ‘सनी लिओनीनं या गाण्यावर अश्लिल डान्स केला आहे. त्यामुळे हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.’ असा आरोप सनीवर करण्यात आला आहे. यासोबतच सनीच्या या व्हिडीओ अल्बमवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे. असं न केल्यास सनीच्या विरोधात खटला दाखल करण्यात येईल असा इशाराही या संतांकडून देण्यात आला आहे.
सनी लिओनीचं ‘मधुबन’ हे गाणं २२ डिसेंबरला प्रदर्शित झालं होतं. प्रदर्शनानंतर काही वेळातच हे गाणं खूप व्हायरल झालं आणि त्यावरून सनीला खूप ट्रोल करण्यात आलं होतं. या गाण्यावर सनी ज्याप्रकारे डान्स करत आहे त्याला अनेकांनी अश्लिल डान्स म्हटलं आहे. ‘राधा आमच्यासाठी पूज्यनीय आहे आणि या गाण्यामुळे विशेषतः सनीच्या डान्समुळे हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या जात आहेत. त्यामुळे या गाण्यावर बंदी घालावी.’ अशी मागणी केली जात आहे.