bharat jadhav

भरत जाधवच्या या फोटोवर अभिनेता अंकुश चौधरीनेही कमेंट केली आहे. त्यावर कमेंट करताना अंकुशने ‘कमाल दिवस’ असे म्हटलं आहे.

    महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमातून अंकुश चौधरी, भरत जाधव, केदार शिंदे, हे हरहुन्नरी कलावंत उदयाला आले. अलिकडेच भरत जाधवने त्याच्या इन्स्टाग्रामवर त्या कार्यक्रमा दरम्यानचा एक फोटो शेअर केला आहे.भरत जाधवने शेअर केलेला हा फोटो तब्बल ३० वर्षांपूर्वीचा आहे.

    हा फोटो शेअर करताना भरत जाधवने लिहलं की, “हा फोटो खूप कमाल आहे. महाराष्ट्राची लोकधाराच्या वेळेसचा. साधारणतः ३० वर्षांपूर्वीचा. या बसमध्ये तीन जिवलग मित्र तीन वेगवेगळ्या विंडो सीट पाशी बसलेले आहेत. तिघेही मराठी नाटक आणि लोककलेच्या प्रेमाने झपाटलेले. आयुष्यात महत्वाच्या वळणांवर अशी योग्य माणसं भेटत गेली आणि प्रामाणिकपणे कष्ट घेतले तर जगणं किती सुंदर हाऊ शकतं हे तिघांनीही अनुभवलंय..!”

    भरत जाधवच्या या फोटोवर अभिनेता अंकुश चौधरीनेही कमेंट केली आहे. त्यावर कमेंट करताना अंकुशने ‘कमाल दिवस’ असे म्हटलं आहे. तर एका नेटकऱ्याने कमेंट करताना ‘सोनेरी दिवसांची साक्ष’, असे म्हटलं आहे. तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने ‘तुम्ही तिघांनी जी धमाल आणली मराठी सिनेमात, त्यास काही तोड नाही’, असे म्हटले आहे. दरम्यान भरत जाधवने शेअर केलेल्या या फोटोची सध्या प्रचंड चर्चा पाहायला मिळत आहे. त्याची ही पोस्टही प्रचंड व्हायरल होत आहे.

     

    View this post on Instagram

     

    A post shared by Bharat Jadhav (@sahibharat)