milind gunaji son marriage

अभिषेक गुणाजीने (Abhishek Gunaji Got Married With Radha Patil) राधा पाटीलसोबत लग्न केले आहे. अभिषेक आणि राधा यांचा विवाह सोहळा मालवण(Abhishek Gunaji Wedding In Malvan) येथे पार पडला.

  मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकार मिलिंद व राणी गुणाजी(Milind And Rani Gunaji) यांचा मुलगा अभिषेक गुणाजी नुकताच लग्न बंधनात अडकला आहे. अभिषेक गुणाजीने (Abhishek Gunaji Got Married With Radha Patil) राधा पाटीलसोबत लग्न केले आहे. या दोघांच्या जोडप्याची चर्चा ही त्यांच्या साखरपुड्याच्या बातमी नंतर चांगलीच रंगली होती. अभिषेक आणि राधा यांचा विवाह सोहळा मालवण(Abhishek Gunaji Wedding In Malvan) येथे पार पडला.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Abhishek Gunaji (@abhishekgunaji)

  मिलिंद आणि राणी गुणाजीने  आपले आशीर्वाद देत अभिषेक आणि राधा यांच्या ‘अनोख्या डेस्टिनेशन वेडिंग’ संकल्पनेचे कौतुक केले आहे. भारतात विशेषतः महाराष्ट्रातील निसर्ग आणि साधेपणाची संस्कृती जपत लग्न करण्याचा निर्णयाला त्यांनी पाठिंबा दिला.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Rani Gunaji (@ranigunaji)

  अभिषेक हा आय.टी. अभियंता आहे, जो आता चित्रपट आणि निर्मितीच्या प्रेमात पडला होता. अभिषेकाची पत्नी राधा सुद्धा मुंबईत फार्मा क्षेत्रात काम करत आहे. अभिषेकने अलीकडेच सुमित राघवन आणि मिलिंद गुणाजी यांच्या सोबत ‘छल’ हा लघुपट दिग्दर्शित केला आहे. या लघुपटाला बर्लिन फ्लॅश फिल्म फेस्टिव्हलमध्ये नामांकन मिळाले आहे. या व्यतिरिक्त अभिषेक व्यावसायिक जाहिरातींसाठी देखील काम करत आहे.