mud mud ke teaser

अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) आणि ‘३६५ डेज’ फेम अभिनेता मिशेल मोरोन (Michele Morrone) लवकरच ‘मुड -मुड के’(Mud Mud Ke) म्युझिक व्हिडिओमध्ये (Music Video) एकमेकांसोबत रोमान्स करताना दिसणार आहेत. हे गाणं व्हॅलेटाईन वीकमध्ये (Valentine Week 2022) १२ फेब्रुवारीला रिलीज होणार आहे. पण त्याआधी निर्मात्यांनी ‘मुड -मुड के’ चा टीझर रिलीज केला आहे. या टीझरमध्ये जॅकलीन आणि मिशेल यांची सुंदर केमिस्ट्री पाहायला मिळाली. हे दोघे पहिल्यांदाच एकमेकांसोबत काम करताना दिसणार आहेत. टीझर रिलीज करण्याआधी निर्मात्यांनी या म्युझिक व्हिडिओचं पोस्टर जारी केलं होतं. हे पोस्टर लोकांना खूप आवडलं. तुम्हीही बघा ‘मुड-मुड के’ चा दमदार टीझर