manoj patil and sahil khan

अभिनेता साहिल खानला(Sahil Khan) मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाने अटकेपासून दिलासा दिला आहे. साहील खानला दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने मंजूर(Bail To Sahil Khan) केला.

    मुंबई : बॉडीबिल्डर मनोज पाटीलला आत्महत्येस(Manoj Patil Suicide Case) प्रवृत्त केल्याप्रकरणी अटकेची टांगती तलवार असलेल्या अभिनेता साहिल खानला(Sahil Khan) मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाने अटकेपासून दिलासा दिला आहे. साहील खानला दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने मंजूर(Bail To Sahil Khan) केला.

    मिस्टर इंडियाचा किताब पटकावणारा आणि प्रसिद्ध बॉडी बिल्डर असलेल्या मनोज पाटीलने साहिल खानने भूतकाळातील राग ठेऊन मानसिक त्रास दिल्याचा तसेच धमकावल्याचा आरोप करत १५ सप्टेंबर रोजी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आपल्याला साहिल खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत असल्याचा आरोप मनोजने केला आणि या प्रकरणी ओशिवरा पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना लेखी पत्रही लिहिले. त्यानुसार साहिल विरोधात कलम ३०६ (आत्महत्येस प्रवृत्त करणे), ५११ (जन्मठेपेची शिक्षा), ५०० (बदनामीची शिक्षा), ५०६ (गुन्हेगारी धमकीची शिक्षा), ३४ (इतर आरोपींसह सामान्य हेतू) अंतर्गत २० सप्टेंबर रोजी साहिल खान विरोधात ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

    एफआयआर नोंदवण्यात आल्यानंतर साहिलेनी मनोजविरोधात ओशिवरा पोलीस ठाण्यात आपल्याविरोधात खोटा गुन्हा दाखल केला असल्याचा दावा करत गुन्हा नोंदवला. मात्र, आपल्याला अटक होऊ नये म्हणून साहिलने लगेचच दिंडोशी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला. मात्र, २३ सप्टेंबर रोजी न्यायालयाने साहिलचा अर्ज फेटाळून लावल्यानंतर साहिले उच्च न्यायालयात धाव घेतली होती. आपल्याविरोधात दाखल करण्यात आलेला एफआयआर हा चुकीचा, अयोग्य आणि बेकायदेशीर असल्याचा दावा साहिलेने याचिकेतून केला आहे. त्यावर मंगळवारी न्या. नितीन सांब्रे यांच्यासमोर सुनावणी पार पडली. याप्रकरणी प्रथमदर्शनी साहिलने मनोज पाटीलला आत्महत्येला प्रवृत्त केल्याचे दिसत नसल्याचे स्पष्ट मत न्यायालयाने नोंदवत साहिलला २५ हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करत त्याला याप्रकरणी पोलीस तपासांत सहकार्य करण्याचे निर्देशही देण्यात आले.