
कला क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल चित्रपट अभिनेत्री पूजा सावंत (Suvichar Gaurav Purskar To Pooja Sawant)यांची सुविचार गौरव पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. तर अभिनय क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल अभिनेते चिन्मय उदगीरकर (Chinmay Udgirkar) यांना सुविचार गौरव विशेष पुरस्काराने सन्मानित येणार आहे.
अभिनेत्री पूजा सावंत (Pooja Sawant) आणि अभिनेता चिन्मय उदगीरकर (Chinmay Udgirkar) यांना नाशिकमधील (Nashik) अत्यंत मानाचा समजला जाणारा सुविचार गौरव पुरस्कार (Suvichar Gairav Purskar) जाहीर झाला आहे. समाजाच्या विविध क्षेत्रात अविरतपणे काम करणाऱ्या मान्यवरांचा या पुरस्काराने सुविचार मंचतर्फे गौरव करण्यात येतो.
कला क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल चित्रपट अभिनेत्री पूजा सावंत यांची सुविचार गौरव पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. तर अभिनय क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल अभिनेते चिन्मय उदगीरकर यांना सुविचार गौरव विशेष पुरस्काराने सन्मानित येणार आहे. हेमंत राठी यांना जीवन गौरव पुरस्काराने तसेच कोरोना काळातील रुग्ण सेवेसाठी डॉ. अतुल वडगांवकर (वैद्यकीय), निवृत्त प्राचार्य मधुकर कडलग (शैक्षणिक), जेष्ठ साहित्यिक प्रा. शं. क. कापडणीस (साहित्य), नितीन महाजन (प्रशासन), महाराष्ट्र महिला क्रिकेट संघातील खेळाडू ईश्वरी सावकार (क्रीडा), किशोर खैरनार (कृषी) यांनाही सुविचार गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
सार्वजनिक वाचनालयाचे माजी अध्यक्ष मधुकर झेंडे यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्निल तोरणे व जेष्ठ साहित्यिक प्रा. विनोद गोरवाडकर हे सदस्य असलेल्या निवड समितीने सर्वोत्तम गौरवपात्र व्यक्तींची निवड केली आहे. रविवारी २ जानेवारी रोजी सांयकाळी ४ वाजता जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते नाशिक येथील रावसाहेब थोरात सभागृहात आयोजित एका शानदार कार्यक्रमात सुविचार गौरव पुरस्कारांनी मान्यवरांचा गौरव करण्यात येणार आहे.