award to poraga majetay movie

‘पोरगं मजेतय’ (Poraga Majetay)या चित्रपटानं संत तुकाराम सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपटाचा पुरस्कार (Award To Poraga Majetay Movie)पटकावला आहे.

    पुणे फिल्म फाऊंडेशन आणि राज्य सरकारतर्फे आयोजित १९ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात(Pune International Film Festival) ‘पोरगं मजेतय’ (Poraga Majetay)या चित्रपटानं संत तुकाराम सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपटाचा पुरस्कार (Award To Poraga Majetay Movie)पटकावला आहे. तसेच या चित्रपटासाठी शशांक शेंडे यांना सर्वोत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार मिळाला आहे. सर्वाधिक पुरस्कार मिळवत या महोत्सवात ‘पोरगं मजेतय’ चित्रपटानं बाजी मारली आहे.

    या चित्रपटासाठी विजय शिंदे, मकरंद माने आणि शशांक शेंडे हे त्रिकुट एकत्र आलं आहे. आपल्या या यशाबद्दल आनंद व्यक्त करताना हे तिघंही म्हणाले की, उत्तम आशयसंपन्न कलाकृतीसाठी एकत्र येत आम्ही ‘पोरगं मजेतय’ हा चित्रपट प्रेक्षकांसाठी आणला. आज वेगवेगळ्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात तो गाजत असून, पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पुरस्कारानं त्यावर यशाची मोहोर उमटवली आहे. झी समूहासारख्या नामांकित माध्यम कंपनीचा अनुभव गाठीशी घेऊन दर्जेदार मराठी चित्रपटांच्या निर्मितीसाठी विजय शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे. बाप लेकामधल्या तरल नात्याचा भावनिक प्रवास ‘पोरगं मजेतय’ या चित्रपटातून उलगडला जाणार आहे.