
अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ (Pushpa Box Office Collection) या चित्रपटाने उत्कृष्ट बॉक्स ऑफिस कलेक्शनने सगळ्यांना आश्चर्यचकित केले आहे. या चित्रपटाने असा विक्रम केला आहे, जो ऐकून अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरणार नाही.
‘स्पायडरमॅन : नो वे होम’ (Spider Man No Way Home) या हॉलिवूड चित्रपटासह प्रदर्शित झालेला चित्रपट ‘पुष्पा’ (Pushpa) सध्या जोरात सुरू आहे. अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ (Pushpa Box Office Collection) या चित्रपटाने उत्कृष्ट बॉक्स ऑफिस कलेक्शनने सगळ्यांना आश्चर्यचकित केले आहे. या चित्रपटाने असा विक्रम केला आहे, जो ऐकून अल्लूच्या चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरणार नाही.
अल्लू अर्जुन स्टारर ‘पुष्पा’ या चित्रपटाला देशभरातील प्रेक्षक पसंती देत आहेत. तमिळ, तेलगू या साऊथच्या चित्रपटांची क्रेझ आणि लोकप्रियता प्रचंड आहे. पण, हिंदी सिनेविश्वातही साऊथच्या चित्रपटांनाही मोठा प्रेक्षकवर्ग आहे आणि हे आता सिद्ध झाले आहे. किंबहुना, तेलुगु चित्रपटसृष्टीत धुमाकूळ घालणारा अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा द राइज’ हिंदी भाषिक प्रेक्षकांमध्येही आपली ताकद दाखवत आहे.
चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली आहे आणि अल्लू अर्जुनचे स्टारडम सिद्ध केले आहे. गेल्या तीन वर्षांत हिंदीमध्ये प्रदर्शित झालेल्या दक्षिण भारतीय चित्रपटांबद्दल बोलायचे तर, २०१८ मध्ये आलेल्या कन्नड चित्रपट ‘केजीएफ चॅप्टर ‘१’ बद्दल सर्वात जास्त चर्चा झाली. परंतु, पुष्पाने केजीएफ चॅप्टर १ ला देखील मागे टाकले आहे. ‘पुष्पा’ हिंदीने १३ दिवसांत ४५.५ कोटींची कमाई केली असून, आता अल्लू अर्जुनच्या चित्रपटाने पहिल्या क्रमांकावर आपले स्थान निर्माण केले आहे.