samantha o bolega song

पहिलं पोस्टर रिलीज झाल्यापासून लाइमलाईटमध्ये असलेल्या ‘पुष्पा’(Pushpa) या आगामी चित्रपटातील समांथावर चित्रीत करण्यात आलेलं ‘ओ बोलेगा... या ओ ओ बोलेगा...’ (Oo Bolega Ya Oo Oo Bolega Song Release)हे गाणं रसिकांच्या भेटीला आलं आहे.

    देखण्या चेहऱ्यासोबतच आपल्या मनमोहक अभिनयाच्या बळावर अभिनेत्री समांथा प्रभूनं(Samantha Prabhu) दक्षिणेपासून हिंदीपर्यंत आपला वेगळा चाहतावर्ग तयार केला आहे. नुकत्याच रिलीज झालेल्या एका गाण्यात रसिकांना सामंथाच्या डान्सचा जलवा अनुभवायला मिळत आहे. पहिलं पोस्टर रिलीज झाल्यापासून लाइमलाईटमध्ये असलेल्या ‘पुष्पा’(Pushpa) या आगामी चित्रपटातील समांथावर चित्रीत करण्यात आलेलं ‘ओ बोलेगा… या ओ ओ बोलेगा…’ (Oo Bolega Ya Oo Oo Bolega Song Release)हे गाणं रसिकांच्या भेटीला आलं आहे.

    या आयटम साँगमध्ये समांथाचं यापूर्वी कधीही न दिसलेलं रूप पहायला मिळत आहे. अल्लू अर्जुनची मुख्य भूमिका असलेल्या ‘पुष्पा’मध्ये समांथा पहिल्यांदाच डान्स नंबरमध्ये दिसणार आहे. आजवर बरीच आयटम साँग्ज देणारे संगीतकार देवी श्री प्रसाद यांनी हे गाणं कंपोझ केलं आहे. गणेश आचार्यनं या गाण्याची कोरिओग्राफी केली आहे. या गाण्याचं हिंदी व्हर्जन कनिका कपूरच्या आवाजात रसिकांना ऐकायला मिळत आहे. हिंदी गाण्याचं लेखन रकीब आलम यांनी केलं आहे. गोल्डमाईन्स टेलिफिल्म्स प्रा. लि.ची प्रस्तुती असलेल्या ‘पुष्पा’ची निर्मिती मनिष शाह यांनी केली असून, दिग्दर्शन सुकुमार यांनी केलं आहे. १७ डिसेंबरला हा चित्रपट रिलीज होणार आहे.