ranbir kapoor and alia bhatt

आलिया भट्ट(Alia Bhatt) आणि रणबीर कपूर(Ranbir Kapoor) यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘ब्रह्मास्त्र’(Brahmastra Motion Poster Release) चित्रपटाचं मोशन पोस्टर नुकतंच प्रदर्शित झालं. या कार्यक्रमात एका पत्रकारानं रणबीरला, ‘आलियाशी किंवा इतर कोणाशीही लग्न(Ranbir Kapoor And Alia Bhatt Marriage) कधी करणार आहेस ?’ असा प्रश्न विचारला. यावर रणबीरनं अशी काही प्रतिक्रिया दिली की, त्यावर सर्वजण अवाक झाले. रणबीर आणि आलियाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे.

    काही दिवसांपूर्वीच कतरिना कैफ- विकी कौशल आणि अंकिता लोखंडे- विकी जैन लग्नाच्या बेडीत अडकले. याशिवाय अनेक टीव्ही सेलिब्रेटींनीही यावर्षी लग्नगाठ बांधली. सगळ्यांना सध्या अभिनेता रणबीर कपूर(Ranbir Kapoor And Alia Bhatt) आणि अलिया भट्ट यांच्या लग्नाची उत्सुकता आहे. नुकत्याच व्हायरल (Viral Video) झालेल्या एका व्हिडीओवरून हे स्पष्ट झालंय की स्वतः रणबीर आणि आलियालाही ते लग्न(Ranbir Kapoor And Alia Bhatt Marriage) कधी करणार याची माहिती नाही.

     

    View this post on Instagram

     

    A post shared by Alia Bhatt ☀️ (@aliaabhatt)

    आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाचं मोशन पोस्टर नुकतंच प्रदर्शित झालं. या कार्यक्रमात एका पत्रकारानं रणबीरला, ‘आलियाशी किंवा इतर कोणाशीही लग्न कधी करणार आहेस ?’ असा प्रश्न विचारला. यावर रणबीरनं अशी काही प्रतिक्रिया दिली की, त्यावर सर्वजण अवाक झाले. रणबीर आणि आलियाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे.

    पत्रकाराच्या प्रश्नाचं उत्तर देताना रणबीर म्हणाला, ‘आपण या वर्षाभरात अनेकांची लग्नं पाहिली आहेत नाही का? आपण त्या सर्वांसाठी आनंदी असायला हवं.’ यानंतर रणबीर अचानक आलियाकडे वळला आणि म्हणाला, ‘आपलं लग्न कधी होणार?’ रणबीरच्या या प्रश्नाने आलियाही हैराण झाली आणि म्हणाली, ‘तू मला हे का विचारत आहेस ?’ यावर स्पष्टीकरण देताना रणबीरनं अयानकडे इशारा करुन म्हटलं, ‘मी त्याला विचारत होतो.’ अयान म्हणाला, ‘आजसाठी एकच तारीख पुरेशी आहे. ती म्हणजे ‘ब्रह्मास्त्र’च्या प्रदर्शनाची तारीख.’


    ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात रणबीर कपूर ‘शिवा’ नावाची भूमिका साकारत आहे. ज्याच्याकडे सुपर नॅचरल पॉवर आहे. ही एका अशा सामान्य मुलाची कथा आहे जो असामान्य शक्ती घेऊन जन्माला आला आहे. या चित्रपटात रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्यासोबतच डिंपल कपाडिया, अमिताभ बच्चन आणि मौनी रॉय यांच्याही म्हत्त्वपूर्ण भूमिका आहेत. हा चित्रपट पुढच्या वर्षी म्हणजेच ९ सप्टेंबर २०२२ ला रिलीज होणार आहे.