अभिनेत्री रेखाचा मोठा खुलासा – लग्न न करण्यामागचं ‘हे’ आहे कारण, व्हिडीओ व्हायरल

सलमान खान हा बॉलिवूड अभिनेत्री रेखा (Rekha Comment On Marriage) यांचा मोठा चाहता होता. विशेष म्हणजे तो सायकलवरुन तिचा पाठलागही करायचा, असा खुलासा खुद्द रेखा (Secret Shared By Rekha) यांनी केला होता.

  अभिनेता सलमान खानने (Salman Khan) अद्याप लग्न केलेले नाही. सलमान खानचे नाव अनेक अभिनेत्रींशी आतापर्यंत जोडण्यात आले आहे. मात्र त्याने अजून लग्न न करण्याचं कारण समोर आलं आहे.  सलमान खान हा बॉलिवूड अभिनेत्री रेखा (Rekha Comment On Marriage) यांचा मोठा चाहता होता. विशेष म्हणजे तो सायकलवरुन तिचा पाठलागही करायचा, असा खुलासा खुद्द रेखा (Secret Shared By Rekha) यांनी केला होता.

  रेखाने ‘बिग बॉस’च्या आठव्या सीझनमध्ये आल्यावर याचा खुलासा केला होता.  त्यांनी सलमानच्या बालपणीचा एक खोडकर किस्सा सांगितला होता. याचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. यात रेखा म्हणते, “मी सकाळी लवकर चालायला जायचो. त्यावेळी तो फक्त ६ ते ७ वर्षांचा होता. त्यावेळी तो सायकल चालवत असायचा. मी पुढे चालत असायची आणि तो माझ्या मागे असायचा. त्यावेळी तो माझ्या प्रेमात पडला होता, ज्याची त्याला कल्पनाही नव्हती.”

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Rekha ❤ (@fairy_rekha)

  “यानंतर त्याने घरी गेल्यानंतर मी मोठा झाल्यावर या मुलीशी लग्न करेन असे सांगितले होते. रेखाचे हे बोलणे ऐकून सलमान लाजतो आणि म्हणतो, कदाचित म्हणूनच माझे लग्न झालेले नाही. पण त्यानंतर रेखा त्याला थांबवते आणि सांगते, नाही, नाही, म्हणूनच मी लग्न केले नाही.” दरम्यान हा संपूर्ण व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. एका फॅन पेजवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.