ritesh deshmukh wed movie

रितेश देशमुखने पहिल्यांदाच दिग्दर्शित(Riteish Deshmukh To Direct Movie For The First Time) केलेला ‘वेड’(Ved) हा मराठी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रितेशने सोशल मीडियावरील पोस्टद्वारे ‘वेड’ चित्रपटाची घोषणा केली आहे.

    अभिनेता रितेश देशमुखला (Riteish Deshmukh)आजवर आपण अनेक सिनेमांमध्ये अभिनय करताना बघितले आहे. आता रितेश देशमुख दिग्दर्शक(Riteish Deshmukh Ventures Into Direction) म्हणून काम करणार आहे. रितेश देशमुखने पहिल्यांदाच दिग्दर्शित(Riteish Deshmukh To Direct Movie For The First Time) केलेला ‘वेड’(Ved) हा मराठी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रितेशने सोशल मीडियावरील पोस्टद्वारे ‘वेड’ चित्रपटाची घोषणा केली आहे.

    रितेशने सोशल मीडियावर चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं असून त्यासोबत त्याने लिहिलं आहे की, “वर्ष २००१. साधारण २० वर्षांपुर्वीची गोष्ट. मी कॅमेऱ्यासमोर उभा राहिला होतो. तेव्हा मनात भिती, उत्सुकता आणि जिद्द होती, पण ते स्वप्न होतं, काहींना वाटलं की हा वेडेपणा आहे. नंतर आपण सगळ्यांनी अनेक आशीर्वाद आणि प्रेम देऊन हे #वेड जिवंत ठेवलं. वर्ष २०२१. मी कॅमेऱ्याच्या मागे जाण्याचा वेडेपणा करतोय. मनात तशीच भिती, उत्सुकता आणि जिद्द आहे. पुन्हा आपल्या सगळ्यांचे प्रेम आणि आशीर्वाद असु द्या . परत एक स्वप्न पाहतोय. परत नवं #वेड मांडतोय. – रितेश विलासराव देशमुख”.

    रितेश देशमुखने दिग्दर्शित केलेला ‘वेड’ हा पहिला चित्रपट कसा असणार याबद्दल आता प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. या चित्रपटामध्ये कोण कलाकार काम करणार हेदेखील अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही.