sadhana sargam in indian idol marathi

दोन दशकं बॉलिवूडवर राज्य करणाऱ्या आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या गायिका साधना सरगम (Sadhana Sargam In Indian Idol Marathi) या आठवड्यात ‘इंडियन आयडॉल मराठी’मध्ये (Indian Idol Marathi) विशेष पाहुण्या म्हणून येणार आहेत.

    सोनी मराठी (Sony Marathi) वाहिनीवर सुरू असलेल्या ‘इंडियन आयडॉल मराठी’ (Indian Idol Marathi) या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. इंडियन आयडॉल हा कार्यक्रम पहिल्यांदाच प्रादेशिक भाषेत होत आहे. कार्यक्रमाची निर्मिती आराधना भोला यांच्या फ्रिमेन्टल इंडिया टेलिव्हिजन प्रॉडक्शन्स प्रा. लि. या संस्थेनं केली आहे. या कार्यक्रमाचे परीक्षक अजय-अतुल(Ajay Atul) असल्याने कार्यक्रमाची रंगत वाढत आहे. दोन दशकं बॉलिवूडवर राज्य करणाऱ्या आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या गायिका साधना सरगम (Sadhana Sargam In Indian Idol Marathi) या आठवड्यात ‘इंडियन आयडॉल मराठी’मध्ये (Indian Idol Marathi) विशेष पाहुण्या म्हणून येणार आहेत.

    ‘विधाता’ या चित्रपटातील ‘सात सहेलियां खडी खडी…’ या गाण्याद्वारे साधना यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. आजवर त्यांनी ३४ भाषांमध्ये १५ हजारांहून अधिक गाणी गायली आहेत. ‘सातसमंदर पार मैं तेरे पीछे पीछे गई…’ या गीतानं ९० च्या दशकात धुमाकूळ घातला होता. हे गीत गाणाऱ्या साधना यांच्या अनेक गाण्यांनी लाखो चाहते घायाळ आहेत. ‘हर किसी को नहीं मिलता…’, ‘मैं तेरी मोहोब्बत में…’, ‘तेरी उम्मीद तेरा इंतजार…’ आणि ‘नीले नीले अंबर पर…’ या गाण्यांतून रसिकांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या साधना या मराठी मुलीनं तब्बल ३४ भाषांत गीतं गायली. कल्याणजी-आनंदजी जोडीपासून ए. आर. रहमानपर्यंत सर्वांनीच त्यांचं कौतुक केलं. उदित नारायण यांच्याबरोबर ‘जो जीता वही सिकंदर’ या सिनेमातलं गाजलेलं गाणं ‘पहला नशा पहला खुमार…’ गाणाऱ्या साधना ‘इंडियन आयडॉल मराठी’ या मंचावर स्पर्धकांचं मनोबल वाढवून त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत.