sakht jaan song from 83

अभिनेता रणवीर सिंगचा (Ranveer Singh) ‘83’ (83 Movie) चित्रपट रिलीजसाठी पूर्ण तयार आहे. ‘83’ हा चित्रपट २४ डिसेंबरला चित्रपटगृहामध्ये रिलीज होणार आहे. सध्या या चित्रपटाचे प्रमोशन सुरु आहे. अशातच चित्रपटातील ‘सख्त जान ’ हे गाणं (Sakht Jaan Song Out) रिलीज झालं आहे. या गाण्यामध्ये रणवीर सगळ्या खेळाडूंना प्रोत्साहन देताना दिसत आहे. रणवीर सिंग या चित्रपटात भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांची भूमिका निभावताना दिसणार आहे. कबीर खानने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून हा चित्रपट १९८३ साली भारताने जिंकलेल्या वर्ल्डकपवर आधारित आहे.