bajrangi bhaijaan 2

‘बजरंगी भाईजान’  (Bajrangi Bhaijaan) हा सलमान खानचा (Salman Khan) चित्रपट खूप गाजला होता. या चित्रपटातील सलमाननं साकारलेल्या भाईजानचंही सर्वांनी कौतुक केलं होतं. आता या चित्रपटाचा सिक्वेल रसिकांच्या भेटीला येणार आहे. मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या ‘आरआरआर’च्या प्रि-रिलीज इव्हेन्टमध्ये सलमाननं ‘बजरंगी भाईजान २’ची (Bajrangi Bhaijaan 2) घोषणाही केली आहे.

    ‘राधे’ आणि ‘अंतिम’ असे सलमान खानचे एका मागोमाग एक चित्रपट फ्लॅाप झाले असले तरी त्याच्या चित्रपटांची क्रेझ अद्यापही कमी झालेली नाही. आपला लाडका अभिनेता आपल्यासाठी कोणती भेट घेऊन येणार याची उत्सुकता कायम सलमान खानच्या (Salman Khan) चाहत्यांना असते.

    ‘बजरंगी भाईजान’  (Bajrangi Bhaijaan) हा सलमानचा चित्रपट खूप गाजला होता. या चित्रपटातील सलमाननं साकारलेल्या भाईजानचंही सर्वांनी कौतुक केलं होतं. आता या चित्रपटाचा सिक्वेल रसिकांच्या भेटीला येणार आहे. मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या ‘आरआरआर’च्या प्रि-रिलीज इव्हेन्टमध्ये सलमाननं ‘बजरंगी भाईजान २’ची (Bajrangi Bhaijaan 2) घोषणाही केली आहे.

    बजरंगी भाईजानच्या सिक्वेलचं लेखन एस. एस. राजामौली यांचे वडील के. व्ही. विजयेंद्र प्रसाद करणार आहेत, ज्यांनी ओरिजनल फिल्मचंही लेखन केलं आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन कबीर खाननं केलं होतं. ‘बजरंगी भाईजान’च्या सिक्वेलबाबत सलमाननं मोठा खुलासा केला आहे. या चित्रपटाचं शीर्षक ‘पवन पुत्र भाईजान’  (Pawanputra Bhaijaan) असं असेल.

    सध्या एस. एस. राजामौली यांच्यासोबत चित्रपट करत असल्याच्या वृत्ताचंही सलमाननं खंडन केलं आहे. राजामौली हे एक चांगले दिग्दर्शक असले तरी सध्या आपण त्यांचे वडील के. व्ही. विजयेंद्र प्रसाद यांच्यासोबत निश्चितपणे काम करत असल्याचं सलमाननं सांगितलं आहे. सलमान सध्या ‘टायगर ३’ आणि ‘कभी ईद कभी दिवाली’ या दोन चित्रपटांच्या कामात बिझी आहे. त्यातून फ्री होईपर्यंत ‘पवन पुत्र भाईजान’चं स्क्रीप्ट रेडी होईल अशी त्याला आशा आहे.