salman khan

अभिनेता सलमान खानला (Salman Khan) त्याच्या पनवेल फार्महाऊसवर साप चावल्यावर लगेच रुग्णालयात नेण्यात आले आणि आता तो पूर्णपणे बरा आहे. दरम्यान वाढदिवसानिमित्त (Salman Khan Birthday) सलमानने पत्रकारांशी संवाद साधला.

  अभिनेता सलमान खानला (Salman Khan) त्याच्या पनवेल फार्महाऊसवर असताना साप (Snake Bite To Salman At Panvel Farm House) चावला. चाहत्यांना याविषयी कळताच चाहते देखील काळजीत पडले होते. सर्वांनाच सलमान खानची चिंता वाटत होती. सलमानला साप चावल्यावर लगेच रुग्णालयात नेण्यात आले आणि आता तो पूर्णपणे बरा आहे. दरम्यान वाढदिवसानिमित्त (Salman Khan Birthday)सलमानने पत्रकारांशी संवाद साधला. त्यानंतर त्याने स्वतः सगळी घटना सांगितली.

  दरवर्षी सलमान खान त्याचा वाढदिवस पनवेल फार्म हाऊसवर त्याचे कुटुंब आणि मित्रांसोबत साजरा करतो. यावेळीही त्याने तसेच केले. सलमानने फार्म हाऊसच्या बाहेर येऊन माध्यमांशी संवाद साधला आणि साप चावल्याची संपूर्ण घटना सांगून तब्येतीविषयी सांगितले.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)


  सलमान खानने सांगितले की, माझ्या खोलीत एक साप आला होता, जो पाहून मुले घाबरली. मी त्याला काठीने बाहेर काढत होतो. त्यावेळी काठीचा आधार घेऊन तो माझ्या हातापर्यंत वर आला होता. त्यानंतर मी त्याला सोडता यावे, म्हणून दुसऱ्या हाताने त्याला पकडले. आमच्या कर्मचार्‍यांनी जेव्हा साप पाहिला तेव्हा त्यांना वाटले की, तो विषारी आहे, त्यानंतर त्यांनी जे केले, त्यामुळे सापाने मला एकदा नव्हे तर तीनदा चावा घेतला.

  शनिवारी रात्री घडलेल्या या घटनेनंतर सलमानला तातडीने एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. तेथून रविवारी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. सलमानने पुढे सांगितले की, ‘त्यानंतर आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो. त्या सापाला देखील आम्ही सोबत घेऊन गेलो होतो, तिथे आम्हाला समजले की, तो विषारी नाही. तरीही मी ६ तास हॉस्पिटलमध्ये राहिलो आणि मला अँटी व्हेनमचे इंजेक्शन देण्यात आले. मी आता पूर्णपणे बरा आहे.’

  सलमान खानने सांगितले की, मला बरे वाटत आहे आणि त्यांनी सापाला मारले नाही. मी परत आल्यावर त्यांनी सापाला देखील सोडून दिले. माझी बहीण खूप घाबरली होती म्हणून मी तिच्यासाठी सापासोबत फोटो देखील क्लिक केला. सापाशी मैत्री केली. त्यानंतर सलमान म्हणाला की, माझ्या बाबांनी विचारले काय झाले? साप जिवंत आहे का? म्हणून मी म्हणालो टायगरही जिवंत आहे, सापही जिवंत आहे!