sayali sanjeev

नुकतंच सायली संजीव हिने इन्स्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट (Sayali Sanjeev Instagram Post) शेअर केली आहे. याद्वारे तिने तिच्या वडिलांच्या मृत्यूची बातमी दिली आहे. सायलीने तिच्या वडिलांसोबतचे अनेक फोटो शेअर केले आहेत.

    मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री सायली संजीवच्या(Sayali Sanjeev Father’s Death) वडिलांचे निधन झाले आहे. नुकतंच तिने सोशल मीडियावर(Social Media) एक पोस्ट शेअर(Sayali Sanjeev Emotional Post) करत याबाबतची माहिती दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून सायलीचे वडील आजारी असल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. गेल्या ३० नोव्हेंबर २०२१ ला सायलीच्या वडिलांनी अखेरचा श्वास घेतला.

    नुकतंच सायली संजीव हिने इन्स्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. याद्वारे तिने तिच्या वडिलांच्या मृत्यूची बातमी दिली आहे. सायलीने तिच्या वडिलांसोबतचे अनेक फोटो शेअर केले आहेत. याला कॅप्शन देताना ती म्हणाली, “संजीव २६/०७/१९५८ – ३०/११/२०२१. तुला माहित आहे नं बाबा माझं तुझ्यावर सगळ्यात जास्त प्रेम होतं, आहे आणि कायम असेल.. या जगात सगळ्यात जास्त.. तू आयुष्य आहेस माझं.”

    “दैव होता तू, देव होता तू, खेळण्यातला माझा खेळ होता तू.., शहाणी होते मी, वेडा होता तू, माझ्या साठी कारे सारा खर्च केला तू.., आज तू फेडुदे पांग हे मला, जगण्या रे मला अजूनही तूच हवा.. बाबा, थांब ना रे तू, बाबा जाऊ नको दूर….” अशी पोस्ट सायलीने लिहिली आहे. तिने शेअर केलेल्या या ओळी व्हेंटिलेटर चित्रपटातील एका गाण्यातील आहे.
    सायलीच्या या पोस्टनंतर अनेक मराठी कलाकारांनी कमेंट करत तिला धीर देण्याचा प्रयत्न केला आहे.