shahid kapoor

शाहिद कपूरनं (Shahid Kapoor) बॉलिवूडमधील घराणेशाहीच्या (Nepotism In Bollywood) वादावर भाष्य केलं आहे. पंकज कपूर (Pankaj Kapoor) आणि नीलिमा अजीम यांसारख्या मोठ्या आणि प्रसिद्ध कलाकारांचा मुलगा असूनही मला कधीच अशा प्रकारच्या संधी मिळाल्या नाहीत, असं तो यावेळी म्हणाला.

    अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) मागच्या काही दिवसांपासून त्याचा आगामी चित्रपट ‘जर्सी’च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. अशाच एका प्रमोशन इव्हेंटमध्ये शाहिदनं बॉलिवूडमधील घराणेशाहीच्या (Nepotism In Bollywood) वादावर भाष्य केलं आहे. पंकज कपूर (Pankaj Kapoor) आणि नीलिमा अजीम यांसारख्या मोठ्या आणि प्रसिद्ध कलाकारांचा मुलगा असूनही मला कधीच अशा प्रकारच्या संधी मिळाल्या नाहीत असं तो यावेळी म्हणाला.

    नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तो म्हणाला, ‘आम्हाला अशा संधी कधी मिळाल्याच नाहीत. लोकांना वाटतं की स्टार किड्सना सहज संधी मिळते पण त्यांना त्याची जाणीव नसते. माझं म्हणणं आहे की, मला स्वतःलाच बॉलिवूडमध्ये असं लॉन्च केलं गेलं नव्हतं.’

    शाहिद कपूर पुढे म्हणाला, ‘मी एका अशा कुटुंबातून आलो आहे जिथे माझे आई-वडील प्रसिद्ध सेलिब्रेटी आहेत. पण मला कधीच अशा प्रकारच्या संधी मिळाल्या नाहीत. मी हळूहळू हे सर्व कमावलं आहे. मी आज जिथे आहे तिथे पोहोचायला बरीच मेहनत घेतली आहे.’

    दरम्यान मागच्या वेळी शाहिद कपूर सुपरहिट चित्रपट ‘कबीर सिंह’मध्ये मुख्य भूमिकेत दिसला होता. त्याचा हा चित्रपट त्या वर्षातला सुपरहिट चित्रपट ठरला होता. आता शाहिद कपूर आणि मृणाल ठाकूर यांच्या भूमिका असलेला ‘जर्सी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  हा चित्रपट ‘जर्सी’ या तेलुगू चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटात शाहिद कपूरचे वडील पंकज कपूरही महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.