shahrukh khan

शाहरुख खान बऱ्याच दिवसांनी मुंबईत दिसला. यावेळी लांब केसांमध्ये त्याचा नवा लूक(Shahrukh Khan New Look For Pathan) दिसला. शाहरुखने  ‘पठाण’च्या (Pathan) २२ डिसेंबरपासून शूटिंगला सुरुवात केली आहे.

    बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खान  (Shahrukh Khan) याच्या पुनरागमनाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. ‘झिरो’ या चित्रपटात २०१८ साली शाहरुख दिसला होता. आता शाहरुखच्या ‘पठाण’ (Pathan) या चित्रपटाची चाहत्यांना प्रतीक्षा आहे. शाहरुखने या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे.

    शाहरुख खान बऱ्याच दिवसांनी मुंबईत दिसला. यावेळी लांब केसांमध्ये त्याचा नवा लूक(Shahrukh Khan New Look For Pathan) दिसला. शाहरुखचे लांब केसांमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. शाहरुखने  ‘पठाण’च्या (Pathan) २२ डिसेंबरपासून शूटिंगला सुरुवात केली आहे. मात्र याविषयी कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

    फोटोमध्ये शाहरुखचे लांब केस आणि उत्तम शरीरयष्टीत दिसत आहे. त्याने काळ्या रंगाचा टी-शर्ट घातला असून केसांची पोनीटेल बांधलेली आहे. ‘पठाण’बद्दल बोलायचे झाले तर, या चित्रपटात शाहरुखसोबत दीपिका पादुकोण मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्याचबरोबर जॉन अब्राहम खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपूर्वी शाहरुख खान यशराज फिल्म्स स्टुडिओमध्ये ‘पठाण’साठी शूटिंग करत होता. यासोबतच शाहरुखने काही भाग दुबईत शूट केला आहे. एवढेच नाही, तर तो बुर्ज खलिफावर काही सीन करताना दिसणार आहे. ‘पठाण’ या चित्रपटात सलमान खानचाही कॅमिओ असणार आहे.