
अक्षय कुमार स्टारर 'सूर्यवंशी' या चित्रपटाने जगभरात बॉक्स ऑफिसवर १०० कोटींची कमाई केली आहे. यासोबतच अक्षयने या चित्रपटाद्वारे त्याचा पूर्वीचा कमाईचा विक्रम मोडला आहे. सूर्यवंशीने पहिल्या आठवड्यात ७७.०८ कोटींचा व्यवसाय केला आहे. अभिनेत्याच्या 'मिशन मंगल'ने ७०.०२ कोटी आणि 'गुड न्यूज'ने ६४.९९ कोटींची कमाई केली आहे.
अक्षय कुमार आणि कतरिना कैफ या तगड्या स्टार्सच्या ‘सूर्यवंशी’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्या वीकेंडला ७७.०८ कोटी कमाई करत शानदार कमबॅक केले. इतकेच नाही तर या चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांत जगभरात १०० कोटींहून अधिकचा व्यवसाय केला आहे. अॅक्शन-कॉमेडी दिग्दर्शक रोहित शेट्टी दिग्दर्शित, सूर्यवंशी हा सिंघम आणि सिम्बा नंतर पोलिसांवर आधारित तिसरा चित्रपट आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सूर्यवंशीने परदेशात ३ दिवसांत बंपर कमाई केली आहे. यूएस-कॅनडामध्ये चित्रपटाने एकूण ५१८५७६ डॉलरची कमाई केली. संयुक्त अरब अमिरातीमध्ये याला एकूण ९४३५८ डॉलर मिळाले. तसेच चित्रपटाने ऑस्ट्रेलियामध्ये १४६०९४ आणि युनायटेड किंगडममध्ये १०३७९७ कमाई केली आहे.
‘सूर्यवंशी’चे परदेशातील ३ दिवसांचे कलेक्शन-
सूर्यवंशी बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे, दोन दिवसात ५० कोटींचा टप्पा पार केला आहे.
दिवस पहिला – USD १.०८ दशलक्ष
दिवस दुसरा – $१.१५ दशलक्ष
दिवस तिसरा – $१.०६ दशलक्ष
एकूण कमाई – $३.२९ दशलक्ष
(भारतीय रुपयात)
पहिला दिवस – ८.१० कोटी
दुसरा दिवस – ८.५८ कोटी
दिवस तिसरा- ७.९० कोटी
एकूण कमाई – २४.५८ कोटी
अक्षय कुमार स्टारर ‘सूर्यवंशी’ या चित्रपटाने जगभरात बॉक्स ऑफिसवर १०० कोटींची कमाई केली आहे. यासोबतच अक्षयने या चित्रपटाद्वारे त्याचा पूर्वीचा कमाईचा विक्रम मोडला आहे. सूर्यवंशीने पहिल्या आठवड्यात ७७.०८ कोटींचा व्यवसाय केला आहे. अभिनेत्याच्या ‘मिशन मंगल’ने ७०.०२ कोटी आणि ‘गुड न्यूज’ने ६४.९९ कोटींची कमाई केली आहे. सूर्यवंशी भारतात चार हजाराहून अधिक आणि परदेशात १३०० स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला आहे. अक्षय आणि कतरिना कैफशिवाय या चित्रपटात रणवीर सिंग आणि अजय देवगण यांच्याही भूमिका आहेत. रिलायन्स एंटरटेनमेंट, रोहित शेट्टी पिक्चर्स, धर्मा प्रोडक्शन आणि केप ऑफ गुड फिल्म्स यांनी संयुक्तपणे या चित्रपटाची निर्मिती केली आहे.