सूर्यवंशीची बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज एन्ट्री, पहिल्याच दिवशी २७ कोटी रुपयांचे कलेक्शन, शेतकऱ्यांच्या विरोधानंतर पंजाबमध्ये शोज नाहीत

गेल्या दीड वर्षांत कोरोना महामारीमुळे मोठे सिनेमे रीलिज झाले नव्हते. थिएटर्सही बंद होती, थिएटर्स उघडल्यानंतर काही सिनेमे रीलिज झाले खरे, पण त्यांचे कलेक्शन फारच कमी होते. पण सूर्यवंशीच्या एन्ट्रीने थिएटर्सकडे पुन्हा प्रेक्षक परततील, ही आशा जिवंत झाली आहे. दोन वर्षांपूर्वी २०१९ साली वॉर सिनेमाने ३० कोटी रुपयांचे ओपनिंग कलेक्शन केले होते. यात ऋतिक रोशन, टायगर श्रॉफ आणि वाणी कपूर ही स्टारकास्ट होती. आता दोन वर्षांनी सूर्यवंशीने चांगला नवा रेकॉर्ड तयार केला आहे.

    मुंबई- आक्षय कुमार, अजय देवणग, रणबीर सिंह आणि कतरिना कैफ स्टाटर सूर्यवंशी सिनेमा शुक्रवारी थिएटरमध्ये रीलीज झाला आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित या सिनेमाला पहिल्याच दिवशी प्रेक्षक आणि समीक्षकांनी जोरदार दाद दिली आहे. याचा परिणाम ओपनिंग कलेक्शनवरही चांगला जाणवला आहे. पहिल्याच दिवशी या सिनेमाने २७ कोटींचा गल्ला जमवला आहे. बऱ्याच काळानंतर सुरु झालेल्या थिएटर इंडस्ट्रीतही या ओपनिंग कलेक्शनमुळे आनंदाचे वातावरण पसरले आहे. बॉलिवूडमध्येही या आनंदाच्या बातमीने अनेकांचा धीर वाढला आहे.

    बॉक्स ऑफिस इंडियाने दिलेल्या माहितीनुसार सूर्यवंशीने पहिल्या दिवशी २७ कोटी रुपये मिळविले आहेत. संपूर्म देशात ४००० स्क्रीन्सवर तर परदेशात ६६ देशांमध्ये १३०० स्क्रीन्सवर हा सिनेमा रीलीज झाला आहे.

    दोन वर्षांचा रेकॉर्ड तोडला

    गेल्या दीड वर्षांत कोरोना महामारीमुळे मोठे सिनेमे रीलिज झाले नव्हते. थिएटर्सही बंद होती, थिएटर्स उघडल्यानंतर काही सिनेमे रीलिज झाले खरे, पण त्यांचे कलेक्शन फारच कमी होते. पण सूर्यवंशीच्या एन्ट्रीने थिएटर्सकडे पुन्हा प्रेक्षक परततील, ही आशा जिवंत झाली आहे. दोन वर्षांपूर्वी २०१९ साली वॉर सिनेमाने ३० कोटी रुपयांचे ओपनिंग कलेक्शन केले होते. यात ऋतिक रोशन, टायगर श्रॉफ आणि वाणी कपूर ही स्टारकास्ट होती. आता दोन वर्षांनी सूर्यवंशीने चांगला नवा रेकॉर्ड तयार केला आहे.

    पंजाबमध्ये शेतकऱ्यांचा सूर्यवंशीला विरोध

    शुक्रवारी सिनेमा रीलिज झाल्यानंतर, संयुक्त किसान मोर्टाने पंजाबमध्ये अक्षयकुमारचा पुतळा जाळून या सिनेमाला विरोध केला होता. सिनेमात अक्षयकुमार नरेंद्र मोदींचा प्रचार करत असल्याचा शेतकऱ्यांचा आक्षेप आहे. ज्यांनी हा सिनेमा तयार केला आहे आणि सिनेमा ज्या चॅनेलवर प्रमोट होतो आहे, त्यांना मोदींचा पाठिंबा असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. अक्षय कुमार आणि सनी देओल हे भाजपासमर्थक आहेत, त्यामुळे त्यांचे कोणतेही सिनेमे पंजाबात प्रदर्शित होऊ देणार नाही, तसचे त्यांचे शूटिंगही होऊ देणार नाही, अशी भूमिका शेतकरी आंदोलकांनी घेतलेली आहे.

    किसान मोर्चाच्या या भूमिकेनंतर पंजाबात अनेक थिएटर्समधून सूर्यवंशी सिनेमा हटविण्यात आला आहे. या आंदोलनाचा परिणाम कलेक्शनवर होणार असल्याचेही स्पष्ट आहे.