The Get Together Party came with Anga; After Kareena Kapoor, Amrita Arora, Malaika Arora, Arjun Kapoor and Alia Bhatt corona positive

करण जोहरच्या घरी पार्टी करणे आता बॉलीवडूला चांगलेच महागात पडू लागले असून करिना कपूर आणि अमृता अरोरानंतर संजय कपूरची पत्नी महीप कपूर आणि सोहेल खानची पत्नी सीमा खान यांना देखील कोरोना झाला आहे(The Get Together Party came with Anga; After Kareena Kapoor, Amrita Arora, Malaika Arora, Arjun Kapoor and Alia Bhatt corona positive).

    मुंबई : करण जोहरच्या घरी पार्टी करणे आता बॉलीवडूला चांगलेच महागात पडू लागले असून करिना कपूर आणि अमृता अरोरानंतर संजय कपूरची पत्नी महीप कपूर आणि सोहेल खानची पत्नी सीमा खान यांना देखील कोरोना झाला आहे(The Get Together Party came with Anga; After Kareena Kapoor, Amrita Arora, Malaika Arora, Arjun Kapoor and Alia Bhatt corona positive).

    संजय कपूरने मंगळवारी माहिती देत सांगितले की, त्या कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या असून त्यांच्यामध्ये सौम्य लक्षणे आहेत. त्यांनी स्वत:ला क्वारंटाईन केले आहे. पालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार, सर्वात आधी सीमा यांना कोरोना झाला. करण जोहरच्या घरी गेट टूगेदर पार्टी ठेवली होती, जेथे करिना आणि अमृता दोघी उपस्थित होत्या. सीमाने कोरोनाचे सौम्य लक्षण आढळल्यानंतर तिने चाचणी केली असता तिचा अहवाल पॉझिटिव्ह आढळला.

    करणच्या घरी झालेल्या पार्टीत करिना, अमृता, महीप आणि सीमा यांच्याशिवाय मलायका अरोरा, अर्जुन कपूर आणि आलिया भट्ट यांनीही हजेरी लावली होती. करिना आणि अमृता कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर, पालिकेने त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांना त्यांची आरटी-पीसीआर चाचणी करण्याचा सल्ला दिला होता. करिनाची बिल्डिंग सील करून, पालिका त्या लोकांचा मागोवा घेत आहे जे अलीकडेच अभिनेत्रीच्या संपर्कात आले आहेत.