52 lakh horse, 9 lakh cat; Sukesh Chandrasekhar Gives Billions To Jacqueline Fernandes

रॅनबॅक्सी कंपनीचे पूर्वीचे मालक शिविंदर सिंग यांची पत्नी आदिती सिंग यांच्याकडून 200 कोटींची खंडणी उकळल्याच्या प्रकरणात सध्या दिल्लीतील तिहार कारागृहात बंदीस्त असलेला ठकसेन सुकेश चंद्रशेखर सध्या चर्चेत आहे. अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने सुकेशला अटक केली आहे. सुकेशच्या चौकशीतून बॉलीवूडचे ‘माफिया’ कनेक्शन उघड झाले आहे. याप्रकरणात अनेक अभिनेत्रींची नावेही समोर आली आहे. त्यात अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिझ, नोरा फतेही, शिल्पा शेट्टी आणि श्रद्धा कपूर यांच्या नावाचा समावेश आहे. विशेष म्हणजे, सुकेशची पत्नी अभिनेत्री लीना मारिया पॉल या प्रकरणाची मास्टरमाईंड असल्याचे आरोपपत्रातून समोर आले आहे(The magic of ransom: Shocking revelations in ED's investigation Sukesh's actress wife 'Mastermind').

  नागपूर : रॅनबॅक्सी कंपनीचे पूर्वीचे मालक शिविंदर सिंग यांची पत्नी आदिती सिंग यांच्याकडून 200 कोटींची खंडणी उकळल्याच्या प्रकरणात सध्या दिल्लीतील तिहार कारागृहात बंदीस्त असलेला ठकसेन सुकेश चंद्रशेखर सध्या चर्चेत आहे. अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने सुकेशला अटक केली आहे. सुकेशच्या चौकशीतून बॉलीवूडचे ‘माफिया’ कनेक्शन उघड झाले आहे.

  याप्रकरणात अनेक अभिनेत्रींची नावेही समोर आली आहे. त्यात अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिझ, नोरा फतेही, शिल्पा शेट्टी आणि श्रद्धा कपूर यांच्या नावाचा समावेश आहे. विशेष म्हणजे, सुकेशची पत्नी अभिनेत्री लीना मारिया पॉल या प्रकरणाची मास्टरमाईंड असल्याचे आरोपपत्रातून समोर आले आहे(The magic of ransom: Shocking revelations in ED’s investigation Sukesh’s actress wife ‘Mastermind’).

  महत्त्वाचे पुरावे केले नष्ट

  आरोपपत्रानुसार, सुकेशची पत्नी या खंडणी प्रकरणाची मास्टरमाईंड असल्याचे समोर आले आहे. तिच्याविरोधात बरेचसे पुरावे पोलिसांच्या हाती आले आहेत. मात्र असे असतानाही लीना चौकशीला सामोरे जाण्यास टाळाटाळ करीत आहे. पतीच्या अटकेची चाहूल लागताच तिने महत्वाचे पुरावे नष्ट केल्याचे सांगण्यात आले आहे. आरोपी अरुण मुथू, आनंद मुर्ती आणि जगदीपने लीनाविषयीची बरीचशी माहिती तपासयंत्रणेला दिल्याचे या आरोपपत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे.

  ‘पिंकी’च्या उत्तरामुळे अधिकारी चक्रावले

  तपास यंत्रणेला सुकेश आणि पिंकी इराणीला समोरासमोर आणायचे होते. त्यासाठी परवानगी देखील मागितली होती. ती मिळाल्यानंतर यंत्रणेने पिंकीला तपासणीसाठी बोलावून घेतले होते. पिंकीने सुकेशची मदत कशाप्रकारे केली हे तपास यंत्रणेला जाणून घ्यायचे होते. सध्या चौकशी केल्यापासून पिंकी ही ईडीच्या ताब्यात आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तपास यंत्रणांनी त्यांची बराचकाळ चौकशी केली. त्यांना एकुण 50 प्रश्न विचारण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र त्या प्रश्नांची उत्तरे तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना चक्रावून टाकणारी होती.

  ‘पीएमओ’च्या नावाने फसवणूक

  चौकशीदरम्यान सुकेशने आपण पंतप्रधान कार्यालयात काम करत असल्याची बतावणी करून फसवणूक केल्याचेही समोर आले आहे. सुकेशने आपण पंतप्रधान कार्यालयात विशेष अधिकारी असल्याचे सांगत शिविंदर सिंह यांच्या पत्नी आदिती सिंहला फसविले आणि तुरुंगातून त्यांना फोन करून 200 रुपये उकळल्याचे चौकशीतून उघडकीस आले आहे. सुकेश आणि आदिती सिंह यांची बहीण अरुंधती खन्ना यांच्या चौकशीदरम्यान काही धक्कादायक खुलासे झाले आहेत. ईडी चौकशीदरम्यान अरुंधती यांनी सांगितले की, सुकेशने त्यांना आपले नाव अभिनव असल्याचे सांगितले. तसेच आपण पंतप्रधान कार्यालयात विशेष अधिकारी असल्याचे सांगितले. त्याचबरोबर आपण आयकर विभाग आणि विविध तपास यंत्रणांशी संलग्न असल्याचा दावाही केला. काही ठराविक परिवारांसोबत समन्वय साधण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाने त्याची विशेष नेमणूक केल्याचा दावा सुकेशने केला असल्याचे अरुंधती यांनी चौकशीदरम्यान सांगितले.

  ईडीचा सेलिब्रेटींवर फोकस

  सुकेशने ईडीच्या चौकशीमध्ये जे खुलासे केले आहेत, त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. 200 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणाशी जॅकलीन फर्नांडिस, नोरा फतेही, शिल्पा शेट्टी, श्रद्धा कपूर आणि हरमन यांचे नाव जोडले गेले आहे. आता हे सर्व सेलिब्रेटी जण ईडीच्या रडारवर आले आहेत. दरम्यान, सुकेशन जॅकलीन हिला खूप साऱ्या महागड्या भेटवस्तू दिल्या होत्या. या दोघांनी काढलेला सेल्फी सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला होता. त्यामुळे या दोघांचे अफेअर असल्याची जोरदार चर्चा सुरू होती. नोराने देखील ईडी चौकशीमध्ये सुकेशने तिला महागडी गाडी भेट दिल्याचे कबूल केले होते.