vicky and katrina

बॉलिवूड लाईफने सोशल मीडियावर विकी आणि कतरिनाला लग्नानंतरचा पहिला लूक (Vicky Kaushal And Katrina Kaif Wedding Photos) दाखवणारे फोटो सोशल मीडियावर शेअर(Vicky and Katrina First Look After Wedding) केले आहेत. खरंतर लग्नाचे कोणतेही फोटो किंवा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ नये असा प्रयत्न या लग्नामध्ये करण्यात आला होता. मात्र तरीही हे फोटो कसे बाहेर आले ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

    सवाई माधोपूर : राजस्थानच्या(Rajsthan) सिक्स सेन्सेस किल्ल्यात आज अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ (Vicky Kaushal And Katrina Kaif Wedding)यांचा विवाहसोहळा पार पडला आहे. विकी आणि कतरिनाचा लग्नानंतरचा पहिला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

    बॉलिवूड लाईफने सोशल मीडियावर विकी आणि कतरिनाला लग्नानंतरचा पहिला लूक दाखवणारे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. खरंतर लग्नाचे कोणतेही फोटो किंवा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ नये असा प्रयत्न या लग्नामध्ये करण्यात आला होता. मात्र तरीही हे फोटो कसे बाहेर आले ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या फोटोची सत्यता अद्याप पडताळण्यात आलेली नाही.

    एक माहिती समोर आली आहे की, या लग्नाचा ७५ टक्के खर्च ही कतरिना कैफने(75 Percent Wedding Expenditure Done By Katrina) केला आहे. उरलेला २५ टक्के खर्च विकी कौशलने केला आहे. या विवाह सोहळ्याचे मीडिया कव्हरेजपासून माध्यमांना रोखण्यात आल्याने, विकी नाखूश असल्याची माहिती आहे. या वेडिंग व्हेन्यूही विकी कौशलला फारसा पसंत नव्हता. पण कतरिनाच्या आनंदासाठी या ठिकाणी विवाह सोहळ्यास तो तयार झाल्याची माहिती आहे. यानिमितताने २०१२ सालची कतरिनाची एक पोस्टही व्हायरल होते आहे, त्यात एका हवेलीत रॉयल वेडिंग करण्याचे आवडेल, असे तिने म्हटले होते. शाही विवाह करण्याचे तिचे स्वप्न वास्तवात आल्याचे यानिमित्ताने दिसते आहे.