vicky and katrina wedding

विकी कौशल आणि कतरिना कैफच्या(Vicky Kaushal And Katrina Kaif Wedding) लग्नामध्ये प्रायव्हसीची(Privacy In Vicky And Katrina Marriage Privacy) विशेष काळजी घेतली जात आहे. एवढ्या प्रायव्हसीमागचे कारण आता समोर आले आहे.

    अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) यांच्या लग्नाचे फंक्शन्स सुरू झाले असून दोघेही ९ डिसेंबरला सात फेरे घेणार आहेत. विकी कौशल आणि कतरिना कैफच्या(Vicky Kaushal And Katrina Kaif Wedding) लग्नामध्ये प्रायव्हसीची(Privacy In Vicky And Katrina Marriage Privacy) विशेष काळजी घेतली जात आहे. एवढ्या प्रायव्हसीमागचे कारण आता समोर आले आहे.

    चाहत्यांना विकी आणि कतरिनाच्या लग्नाचे प्रत्येक तपशील बघायला मिळणार आहेत. मात्र चाहत्यांना ही सर्व दृश्ये एका ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळतील. विकी आणि कतरिनाच्या लग्नाबाबत ओटीटी प्लॅटफॉर्मवर एक मोठा करार झाला आहे. त्यानंतर एकही फोटो किंवा व्हिडीओ व्हायरल होऊ नये, म्हणून इतकी प्रायव्हसीची काळजी घेतली जात आहे.

    कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी त्यांच्या लग्नाचे टेलिकास्ट हक्क ॲमेझॉन प्राईमला विकले गेले आहेत. मिळ‌ालेल्या माहितीनुसार ८० कोटींमध्ये हा करार पूर्ण झाला आहे. या करारामुळेच कतरिना आणि विकीने त्यांच्या पाहुण्यांना एनडीएवर स्वाक्षरी करायला लावली आहे. जेणेकरून ओटीटी प्लॅटफॉर्मच्या आधी लग्नाचा कोणताही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होणार नाही.

    विकी आणि कतरिनाच्या लग्नाच्या या सीरीजमध्ये त्यांच्या रोमान्सपासून ते रोका समारंभ आणि राजस्थानमधील चार दिवसांच्या फंक्शन्सपर्यंत प्रत्येक गोष्ट दिसणार आहे. विकी आणि कतरिनाच्या लग्नाचा हा व्हिडीओ २०२२मध्ये डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. २०१९ मध्ये प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांनी देखील ओटीटी प्लॅटफॉर्मवर त्यांच्या लग्नाच्या शूटची डील केली होती.

    एनडीएमध्ये पाहुण्यांना प्रायव्हसीची काळजी घेणे आणि कार्यक्रमाच्या ठिकाणाहून कोणताही फोटो लीक करण्यास मनाई आहे. पाहुण्यांसाठी एक टीप शेअर करण्यात आली आहे. ज्यामध्ये असे म्हटले आहे की, आम्ही तुम्हा सर्वांना विनंती करतो की, तुम्ही तुमचे फोन तुमच्या खोलीतच ठेवा आणि समारंभातील कोणतेही फोटो पोस्ट करू नका किंवा सोशल मीडियाचा वापर करू नका. विकी आणि कतरिनाच्या लग्नाला १२० पाहुणे येणार आहेत. विकी आणि कतरिना सवाई माधोपूरच्या सिक्स सेन्स फोर्ट बरवरामध्ये लग्न करणार आहेत. या लग्नाचे सोहळे सुरू झाले आहेत. मंगळवारी रात्री विकी आणि कतरिनाचा मेहंदीचा कार्यक्रम पार पडला.