‘वन फोर थ्री’ चित्रपटात वृषभ शहा साकारणार ‘आनंता’ ही भूमिका, पोस्टरमध्ये झळकला नवा खलनायक

‘वन फोर थ्री’ (One Four Three) चित्रपटात वृषभ शहा (Vrushabh Shah) अनंता (Ananta) नावाची भूमिका साकारत आहे. राग, द्वेष आणि क्रूरता हे भाव वृषभच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत असून, त्याचा या चित्रपटात दाखवण्यात आलेला खूनशी स्वभाव चित्रपटातील भूमिकेला साजेसा असेल.

    अभिनेता वृषभ शहा (Vrushabh Shah)‘वन फोर थ्री’ (One Four Three) चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाला आहे. नुकताच त्याचा या चित्रपटातील जबरदस्त लूक (First Look) समोर आला आहे. वृषभ या चित्रपटात खलनायकाच्या(Vrushabh Shah In Negative Role) भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचं एक पोस्टर (Poster) भेटीस आलं असून, त्यावर वृषभचा चित्रपटातील लूक पाहायला मिळत आहे. या चित्रपटात मुख्य अभिनेता पहिल्यांदाच खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

    Vrushabh Shah

    पोस्टरवरून या चित्रपटातील वृषभची भूमिका सहज लक्षात येण्याजोगी आहे. पोस्टरवरील फोटोतील आक्रोश पाहता त्यानं चित्रपटात साकारलेल्या भूमिकेचा थोडासा अंदाज बांधता येत आहे. ‘वन फोर थ्री’ चित्रपटात वृषभ आनंता नावाची भूमिका साकारत आहे. राग, द्वेष आणि क्रूरता हे भाव वृषभच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत असून, त्याचा या चित्रपटात दाखवण्यात आलेला खूनशी स्वभाव चित्रपटातील भूमिकेला साजेसा असेल.

    त्याच्या या भूमिकेसाठी त्याने विशेष मेहनत घेतली असून, १० किलो वजन कमी केलं आहे. शिवाय त्यानं या भूमिकेसाठी स्वतःच्या फिटनेसकडे विशेष लक्ष दिलं आहे. स्वभावानं साधा असलेल्या वृषभकडून खलनायकाची भूमिका करून घेण्याचं दिव्य दिग्दर्शक योगेश भोसले यांची केलं आहे. दाक्षिणात्य चित्रपटाची धाटणी असलेल्या या चित्रपटातील वृषभचा लूक हा तंतोतंत दाक्षिणात्य दिसत आहे. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आपली आवड जोपासत वृषभ अभिनय क्षेत्रात उतरला आहे. यात शीतल अहिरराव मुख्य भूमिकेत आहे.