सोहळा कुटुंबाचा, उत्सव आपुलकीचा– कलर्स मराठी अवॉर्ड २०२०, हे कलाकार ठरले सर्वोत्कृष्ट!

आदेश बांदेकर व सुबोध भावे यांना कृतज्ञता पूर्वक विशेष पुरस्काराने गौरवण्यात आले तर मनोरंजन क्षेत्रात सामाजिक जाणिवेचे भान राखून केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी लेखक अरविंद जगताप यांनाही यावेळी गौरवण्यात आले.

    कलर्स मराठी अवॉर्डची घोषणा झाल्यापासूनच कोणत्या मालिकेला कोणते अवॉर्ड मिळतील… लोकप्रिय मालिका कोण ठरणार याची उत्कंठा प्रेक्षकांमध्ये होती. विविध पुरस्कारांबरोबरच कोविडच्या लॉकडाऊननंतर मनोरंजन क्षेत्राला पुन्हा एकदा मार्गावर आणण्यासाठी केलेल्या विशेष प्रयत्नांसाठी आदेश बांदेकर व सुबोध भावे यांना कृतज्ञता पूर्वक विशेष पुरस्काराने गौरवण्यात आले तर मनोरंजन क्षेत्रात सामाजिक जाणिवेचे भान राखून केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी लेखक अरविंद जगताप यांनाही यावेळी गौरवण्यात आले.

    यावेळी सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेने सर्वाधिक पुरस्कार पटकावले. लोकप्रिय मालिका, लोकप्रिय कुटुंब, लोकप्रिय नायक, नायिकेचा मान या मालिकेतील कलाकारांनी पटकावला. त्याचबरोबर लोकप्रिय सासू इंदू, लोकप्रिय भावंड अभिमन्यू –आशू दादा आणि लोकप्रिय पुरूष सज्जनराव या मालिकेतील व्यक्तीरेखांही पटकवला.

    तर लोकप्रिय जोडी मात्र राजा राणीची ठरली. रणजीत आणि संजीवनीने लोकप्रिय जोडीचा मान पटकावला. तर शर्वरी म्हणजेच सायली संजवी ठरली लोकप्रिय सून. तर सर्वोत्कृष्ट नकारात्मक भूमिकेसाठी शुभमंगल ऑनलाईन मालिकेतील ऐश्वर्या आणि चंद्र आहे साक्षीला मालिकेतील श्रीधर म्हणजे सुबोध भावे.

    रसिकांचा लाडका अभिनेता सुमीत राघवन आणि अभिनेत्री चिन्मयी सुमीत यांनी या सोहळ्याचे खुमासदार सूत्रसंचालन केले.