प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या बद्दल कॉमेडियन एहसान कुरेशी यांची ‘ही’ माहिती

एहसान कुरेशी म्हणाले की, राजू श्रीवास्तव यांच्या पत्नीने त्यांना दिल्लीत येण्यास मनाई केली आहे. कारण रुग्णालयातील डॉक्टर त्यांना अधिक लोकांना भेटू देत नाहीयेत. कुरेशी म्हणाले की, त्यांचे काही मित्र दिल्लीत आहेत, जे त्यांना राजूच्या प्रकृतीबाबत वेळोवेळी अपडेट्स देत आहेत.

    प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Shrivastav Heath Update) यांना हृदयविकाराचा झटका आल्याने रुग्णालयात त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीबद्दल जाणून घेण्याासाठी चाहत्यांचे लक्ष लागलेलं आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना करत आहे. दरम्यान आज सकाळी रुग्णलयातून त्यांची हेल्थ अपडेट समोर आली होती. आता राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीविषयी कॉमेडियन एहसान कुरेशीने (Ahsaan Qureshi) महत्त्वाची माहिती दिली  आहे.

    राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराच्या झटका आल्यानंतर एम्समध्ये दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे देखील सांगण्यात येत आहे. राजू सध्या व्हेंटिलेटरवर असून, डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. दरम्यान, एका ऑनलाइन पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत एहसान कुरेशी म्हणाले, “डॉक्टरांनी कुटुंबीयांना राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीबाबत अद्याप प्रतीक्षा करण्यास सांगितलं आहे, कारण ते सध्या आयसीयूमध्ये डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली आहेत. काही तासांपूर्वी डॉक्टरांनी सांगितलं की राजू यांनी काही हलक्या हालचाली केल्या आहेत. पण त्यांचा मेंदू पूर्णपणे कार्य करत नाहीये किंवा प्रतिसाद देत नाहीये.”

    एहसान कुरेशीने असंही सांगितलं की, त्यांना दिल्लीला जाऊन राज श्रीवास्तव यांची प्रकृती जाणून घ्यायची होती, परंतु राजू यांच्या पत्नीने त्यांना दिल्लीत येण्यास नकार दिला. एहसान कुरेशी म्हणाले की, राजू श्रीवास्तव यांच्या पत्नीने त्यांना दिल्लीत येण्यास मनाई केली आहे. कारण रुग्णालयातील डॉक्टर त्यांना अधिक लोकांना भेटू देत नाहीयेत. कुरेशी म्हणाले की, त्यांचे काही मित्र दिल्लीत आहेत, जे त्यांना राजूच्या प्रकृतीबाबत वेळोवेळी अपडेट्स देत आहेत.