मुंबईकरांना पुन्हा एकदा घेता येणार देशातील सर्वात मोठ्या पॉप कल्चर सेलिब्रेशनचा अनुभव, 20 ते 21 एप्रिल दरम्यान ‘कॉमिक कॉन – 2024’ चं आयोजन!

देशातील सर्वात मोठे पॉप कल्चर सेलिब्रेशन कॉमिक कॉन इंडिया पुन्हा आले आहे. भारतीय आणि जागतिक निर्माते व उत्पादकांपासून अप्रतिम उत्पादने आणि भारतातील (आणि जगातील) सर्वोत्कृष्ट कॉसप्लेअर्सना घेऊन वर्षातील सर्वाधिक रोमांचक विकेंड पुन्हा आला आहे.

    मुंबई : जिथे कल्पनेची वास्तवाशी भेट होते, अशा जगात भारतीय उपखंडातील सर्वात मोठे पॉप कल्चर असलेल्या कॉमिक कॉन इंडियासह पाऊल ठेवण्याची तयारी करा, जे मुंबईत एक वेगळं उत्साहपूर्ण वातावरण तयार करत आहे. वर्षातील सर्वोत्कृष्ट विकेंड पुन्हा येत असल्याने उत्साहाने आणि आनंदाने भरलेल्या विलक्षण शनिवार व रविवारसाठी सज्ज व्हा. कारण मुंबईत 20 ते 21 एप्रिल दोन दिवसीय कॉमिक कॉन फेस्टचं (Mumbai Comic Con 2024) आयोजन करण्यात आलं आहे.

    मारुती सुझुकी अरेना क्रंचीरोलसह सादर करत आहे मुंबई कॉमिक कॉन – 2024. यामध्ये प्रत्येक उपस्थितांना ड्रॅगन बॉल – Z भाग 1 या कॉमिक पुस्तकाची एक प्रत आणि लिमिटेड एडिशन डीसी कॉमिक्स बॅटमॅन पोस्टर आणि कॉमिक कॉन इंडियाचा स्वॅग बॅग भेट म्हणून देण्यात येणार आहे. इंडसव्हर्स, याली ड्रीम्स क्रिएशन्स, सुफी कॉमिक्स, प्रसाद भट, लिलोरोश, ऍसिड टोड, गार्बेज बिन, कॉर्पोरेट कॉमिक्स, बुल्सआय प्रेस, बकरमॅक्स, आर्ट ऑफ सव्हिओ आणि अभिजित किणी यासारख्या प्रकाशन संस्था / भारतीय कलाकारांसह कॉमिक्सचे प्रकाशन करण्यासाठी सज्ज असून आयसनर पुरस्कार विजेते जागतिक कलाकार गाय डेलीसेल आणि जेसन लू या कार्यक्रमाची शोभा वाढवतील आणि चाहत्यांना भेटण्यासाठी, शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित असतील.

    20 आणि 21 एप्रिल 2024 रोजी होणाऱ्या बहुप्रतिक्षित कार्यक्रमामध्ये उपस्थितांना दोन्ही दिवस विविध स्पर्धा, इस्पोर्टस् आणि लोकप्रिय स्ट्रीमर्स आणि इतरही अनेक रोमांचक गतिविधिंसह गेमिंगचा अनुभव घेता येणार आहे.

    कॉमिक कॉन इंडियाने या कार्यक्रमात डेमन स्लेयरचे ध्वनी कलाकार नट्सुकी हना आणि क्रंचीरोलचे युमा तकाहाशी, अमर चित्र कथा, राज कॉमिक्स, हल्लुबोल, बकरमॅक्स यांसारख्या प्रसिद्ध कॉर्पोरेट आणि आघाडीच्या भारतीय आणि जागतिक निर्मात्यांच्या सहभागासह वेगवेगळ्या विशेष सत्रांचे आयोजन केले आहे. याबरोबरच प्रसिद्ध कलाकार रोहन जोशी आणि साहिल शाह आणि हर्ष गुजराल यांचे स्टँड अप सत्र त्यानंतर मुख्य मंचावर डीजे काझू, एम सी अल्ताफ, शाह रुले, गिक फ्रूट, प्रत्येकाचे बालपणीचे आवडते कलाकार गाय रॉब आणि इतरही अनेक कलाकारांचे सादरीकरण होणार आहे. यासोबतच मुंबईतील उपस्थित प्रेक्षकांना मारुती सुझुकी अरेना, क्रंचीरोल आणि पेंग्विन रॅन्डम हाऊस इंडिया आणि बंदाई नमको झोन यांच्या मुंबईतील सर्वात मोठ्या कॉमिक बुक स्टोअरसह आकर्षक अनुभव घेता येणार आहे.