ketaki chitale photo

केतकी चितळेला (Ketaki Chitale) अखेर जामीन मंजूर (Bail granted) झाला आहे. ठाणे सत्र न्यायालयाकडून (Sessions Court) जामीन मंजूर झाला आहे. २५ हजारांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. दरम्यान, केतकी चितळेला (Ketaki Chitale) महाराष्ट्र पोलीस महासंचालक रजनीश शेठ (Rajnish seth) यांना महिला आयोगानं (Women Commission) समन्स पाठवला असून, १७ जूनला (17 June) आयोगासमोर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

    ठाणे : आक्षेपार्ह वक्तव्यांमुळे अडचणीत सापडलेली वादग्रस्त अभिनेत्री केतकी चितळेला (Ketaki Chitale) अखेर जामीन मंजूर (Bail granted) झाला आहे. ठाणे सत्र न्यायालयाकडून (Sessions Court) जामीन मंजूर झाला आहे. २५ हजारांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. दरम्यान, केतकी चितळेला (Ketaki Chitale) महाराष्ट्र पोलीस महासंचालक रजनीश शेठ (Rajnish seth) यांना महिला आयोगानं (Women Commission) समन्स पाठवला असून, १७ जूनला (17 June) आयोगासमोर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

    दरम्यान, नवी मुंबई येथील रबाळे पोलीस ठाण्यात केतकीविरोधात अ‍ॅट्रोसिटीचा (atrocity) गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयानं २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर केतकीचा जामीन मंजूर केला आहे. याआधी ठाणे सत्र न्यायालयात केतकीच्या वकिलांनी तिला जामीन मिळावा यासाठी युक्तीवाद केला होता. तसेच अ‍ॅट्रोसिटी (atrocity) गुन्ह्यात लावण्यात आलेले कलम योग्य नसल्याचा युक्तीवाद वकिलांनी केला होता. या प्रकरणी युक्तीवाद पूर्ण झाल्यावर न्यायालयानं पुढील सुनावणीसाठी १६ जून ही तारीख दिली होती. दरम्यान, आज सुनावणी पार पडल्यानंतर न्यायालयाने केतकीचा जामीन मंजूर केला.

    केतकीला १५ मे रोजी शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावरील आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी अटक करण्यात आली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावरी आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी पुढील सुनावणी २१ जून रोजी होणार आहे. तसेच महिला आयोगानं समन्स पाठवला असून, १७ जूनला आयोगासमोर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.