ईशा मालवीय आणि अभिषेक कुमारमध्ये कडाक्याचं भांडण, वाद धक्काबुकी पर्यत

अभिषेक आणि ईशा यांच्यातील भांडण वाढले. घरातील सर्व सदस्य त्यांना थांबवतात. प्रोमो शेअर करताना कलर्सने लिहिले - मित्रांपासून मित्रांपर्यंत, असे काय घडले ज्यामुळे ईशा, चिंटू आणि अभिषेकचे समीकरण बदलले?

  बिग बॉस १७ : टेलिव्हिजन वरचा वादग्रस्त रिऍलिटी शो बिग बॉस १७ सध्या प्रचंड चर्चेत आहे. बिग बॉस १७ च्या घरात रोज नवनवीन समीकरणे पाहायला मिळत आहेत. नुकताच कलर्स टीव्हीच्या सोशल मीडिया पेजने एक नवा प्रोमो शेअर केला आहे. यामध्ये ईशा आणि अभिषेकमध्ये जोरदार भांडण पाहायला मिळत आहे. एवढेच नव्हे तर ईशानेही अभिषेकला धक्का सुद्धा दिला आहे. व्हिडिओमध्ये अभिषेक ईशाला म्हणतो की, आता तुझा खरा चेहरा समोर आला आहे. आता आपल्याबद्दल सर्व काही माहित आहे. आता थोडं बोलशील का? निघून जा इथून. मग ईशा म्हणते गैरवर्तन करू नकोस आणि अभिषेक म्हणतो मी करेन.

  यांनतर हे प्रकरण आणखी चिघळत आणि त्यांनंतर ईशाने अभिषेकला धक्का दिला. तर अभिषेक म्हणतो का ढकलत आहेस? तू उद्धट आहेस. मग समर्थ मदतीला येतो आणि अभिषेकला थांबवतो. अभिषेक आणि ईशा यांच्यातील भांडण वाढले. घरातील सर्व सदस्य त्यांना थांबवतात. प्रोमो शेअर करताना कलर्सने लिहिले – मित्रांपासून मित्रांपर्यंत, असे काय घडले ज्यामुळे ईशा, चिंटू आणि अभिषेकचे समीकरण बदलले? हा प्रोमो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by ColorsTV (@colorstv)

  ईशा आणि अभिषेकच्या समीकरणाबद्दल बोलायचे झाले तर दोघेही एक्स-कपल आहेत. जेव्हा ते शोमध्ये आले तेव्हा दोघांमध्ये खूप भांडण झाले. दोघेही सलमान खानसमोर एकमेकांवर आरोप करताना दिसले. मात्र, घरात गेल्यावर त्यांनी हळूहळू पुन्हा मैत्री केली होती. पण नंतर कथेत ट्विस्ट आला आणि ईशाचा सध्याचा बॉयफ्रेंड समर्थची एन्ट्री झाली. सुरुवातीला ईशाने समर्थला तिचा प्रियकर म्हणून स्वीकारण्यास नकार दिला, पण नंतर स्वीकारला आणि माफीही मागितली. समर्थांच्या आगमनानंतर अभिषेकने ईशापासून दूर झाला.