बिग बॉस १७ च्या घरातून या आठवड्यात या स्पर्धकांचा संपणार प्रवास

सनी आर्याला कमी वोट मिळाल्यामुळे नव्हे तर 'बिग बॉस'ने सांगितल्यामुळे सनी या कार्यक्रमातून बाहेर पडणार आहे. तहलकाने 'बिग बॉस'च्या नियमांचं उल्लंघन केलं आहे. अभिषेकसोबत वाद घालताना तो दिसून आला.

    बिग बॉस १७ : टेलिव्हिजन वरचा वादग्रस्त रिऍलिटी शो बिग बॉस १७ सध्या प्रचंड चर्चेत आहे. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. या सीझनमध्ये कधी काय धमाका होईल हे कोणीही सांगू शकत नाही. नुकताच एक कलर्स टीव्हीच्या सोशल मीडिया पोस्टवर एक प्रोमो प्रदर्शित झाला आहे. आता असे सांगण्यात येत आहार की, ‘बिग बॉस 17’मधील ‘तहलका’ उर्फ युट्यूबर सनी आर्याचा (Sunny Arya) प्रवास संपला आहे. अभिषेकसोबत वाद घातल्याने सनीला ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर काढण्यात आलं आहे.

    सनी आर्याला कमी वोट मिळाल्यामुळे नव्हे तर ‘बिग बॉस’ने सांगितल्यामुळे सनी या कार्यक्रमातून बाहेर पडणार आहे. तहलकाने ‘बिग बॉस’च्या नियमांचं उल्लंघन केलं आहे. अभिषेकसोबत वाद घालताना तो दिसून आला. त्यामुळे बिग बॉसने त्याला शिक्षा दिली आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तहलका अभिषेकचं टी-शर्ट खेचताना दिसत आहे. ईशा मालवीय दिवसा झोपलेली असते. त्यामुळे अरुण तिला उठवताना दिसतो. दरम्यान अभिषेकला त्याची सांगण्याची पद्धत चुकीची वाटते. सनीदेखील या मुद्द्यावर त्याचं मत मांडतो. सनी आणि अरुण हे एकमेकांचे खास मित्र असून ते अभिषेकसोबत भांडतात. तहलका अभिषेकला अरुणपासून दूर राहण्यास सांगतो. तसेच त्याचं शर्टदेखील खेच खेचत अपशब्दांचा वापर करतो”. तहलकाच्या या वागण्याने ‘बिग बॉस’ने त्याला घरातून बाहेर काढलं आहे.

    सलमान खान ‘बिग बॉस’ हा कार्यक्रम वर्षानुवर्षे होस्ट करत आहे. परंतु काही कारणाने भाईजानला जेव्हा ‘बिग बॉस’ हा कार्यक्रम होस्ट करणं जमत नाही तेव्हा करण जोहर (Karan Johar) हा कार्यक्रम होस्ट करताना दिसतो. यंदाच्या वीकेंडचा वारला देखील सलमान खान होस्ट करणार नाही. त्यामुळे करण जोहर हा कार्यक्रम होस्ट करताना दिसेल.