अमोल कोल्हेंच्या चित्रपटातील भूमिकेवरुन वाद, कलाकार म्हणून अमोल कोल्हेंना अभिव्यक्ती स्वातंत्र्य राष्ट्रवादी काँग्रेस चित्रपट आघाडीची भूमिका

व्हाय आय किल्ड गांधी' चित्रपटातील खासदार अमोल कोल्हेंनी वठविलेली नथुराम गोडसेची भूमिका हा त्यांच्या व्यावसायिक आयुष्याचा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग असल्याचं मत राष्ट्रवादीच्या चित्रपट आणि सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी म्हटलं आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या चित्रपट आघाडीची भूमिका स्पष्ट केली आहे. अमोल कोल्हेंना अनेकांनी टीकेचं लक्ष्य केलं आहे. यावर आता संमिश्र प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे. त्यामुळं या कोल्हेंच्या या भूमिकेवरुन पुन्हा एकदा वाद वाढण्याची शक्यता आहे.

    मुंबई : नुकताच ‘कोण न्हाय कुणचा, वरत भात लोण्चा’ या चित्रपटावरुन वाद झाल्याची घटना ताजी असताना, आता ‘व्हाय आय किल्ड गांधी’ चित्रपटातील खासदार अमोल कोल्हेंनी वठविलेली नथुराम गोडसेची भूमिका हा त्यांच्या व्यावसायिक आयुष्याचा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग असल्याचं मत राष्ट्रवादीच्या चित्रपट आणि सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी म्हटलं आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या चित्रपट आघाडीची भूमिका स्पष्ट केली आहे. या चित्रपटाचा ‘ट्रेलर’  रिलीज झाल्यावर अमोल कोल्हेंना अनेकांनी टीकेचं लक्ष्य केलं आहे. यावर आता संमिश्र प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे. त्यामुळं या कोल्हेंच्या या भूमिकेवरुन पुन्हा एकदा वाद वाढण्याची शक्यता आहे.

    दरम्यान, 2017 मध्ये तयार झालेला हा चित्रपट आता ‘रिलिज होत आहे. मात्र, या चित्रपटाच्या अनुषंगाने खासदार अमोल कोल्हेंना लक्ष्य करणं अनाठायी असल्याची राष्ट्रवादीच्या चित्रपट आघाडीचं म्हणणं आहे. “राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संविधानाचा सन्मान करणारा पक्ष आहे. संविधानाने प्रत्येकाला अधिकार, स्वातंत्र्य आणि कर्तव्य बहाल केले आहे. त्यानुसारच खासदार अमोल कोल्हे कलाकार म्हणून नथुराम गोडसेची भूमिका साकारत असल्याला आमचा विरोध नसल्याचं राष्ट्रवादी चित्रपट आणि सांस्कृतिक विभागानं स्पष्ट केलं आहे.”

    दरम्यान, अमोल कोल्हेंच्या नथुराम गोडसे या भूमिकेवरुन राष्ट्रवादीचे नेते तसेच गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी विरोध केला आहे, गोडसे हे देशासाठी खलनायक आहेत, आणि त्यांची भूमिका साकारणे म्हणजे आपल्या वैचारिक पातळीत न बसण्यासारखे आहे, याबाबत पक्षांची वेगळी भूमिक असेल पण माझा याला विरोध असल्यांच आव्हाडांनी म्हटलेय.

    तर खासदार अमोल कोल्हे यांनी तुम्ही राजकीय नजरेतून न पाहता अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणून बघावे, व याचे राजकारण न करता, अभिनय करण्यासाठी व्यक्तिस्वातंत्र्य असल्याचं अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे.