मराठमोळा अभिनेता सुबोध भावे यांच्यासह कुटुंबीयांना कोरोनाची लागण

मराठी सिनेसृष्टीमधील मरोठमोळे अभिनेते सुबोध भावे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यासह कुटुंबातील सदस्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

मुंबई : राज्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. कोरोनाच्या विळख्यात अनेक कलाकार देखील सापडले आहे. मोठमोठ्या दिग्गज कलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे बॉलिवु़ड अभिनेते अमिताभ बच्चन, अभिनेत्री जेनेलिया देशमुख यांना कोरोनाची लागण झाली होती. यांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तर मराठी सिनेसृष्टीमधील मरोठमोळे अभिनेते सुबोध भावे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यासह कुटुंबातील सदस्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. (Coronavirus infected the family including actor Subodh Bhave)

सुबोध भावे यांनी याबाबत स्वतः ट्विट करत चाहत्यांना माहिती दिली आहे. सुबोध भावे यांनी सांगितले की, मी, मींजीरी आणि माझा मोठा मुलगा कान्हा आम्हा तिघांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच आम्ही स्वतःला घरीच क्वारंटाईन करुन घेतले आहे. तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घेत आहोत. तुम्ही सगळे काळजी घ्या आणि सुरक्षित रहा. अशा आशयाचे ट्विट सुबोध भावे यांनी केले आहे.


दरम्यान सुबोध भावे यांनी ट्विट करत कोरोनाची लागण झाल्याचे सांगितल्यावर सर्वच स्तरांतून त्यांचे चाहते सुबोध भावे आणि कुटुंबीय लवकर बरे होण्यासाठी देवाकडे प्रार्थना करत आहेत.