रवी किशन यांना न्यायालयाकडून दिलासा, कथीत मुलीनं केलेली डीएनए चाचणीची मागणी करणारी याचिका फेटाळली!

रवी किशन यांची कथित मुलगी शिनोवाने मुंबईतील गोरेगाव-दिंडोशी कोर्टात याचिका दाखल केली होती. यामध्ये तिने रवी किशन हे वडील आहेत की नाही यासाठी डीएनए चाचणी करण्याची मागणी केली होती.

    काही दिवसापासून  भोजपुरी अभिनेता आणि गोरखपूरचे भाजप खासदार रवी किशन (Ravi Kishan) अडचणीत सापडले आहेत. एका महिलेनं पत्रकार परिषद घेत दावा केला आहे की ती रवी किशनची पत्नी असून दोघांना एक मुलगी आहे. त्या महिलेच्या मुलीनं रवी किशन यांची डिएनए चाचणी करण्याची याचिका दाखल केली होती. या याचिकेवर न्यायालयानं निकाल दिला असून रवी किशन यांची डिएनए करण्याची मागणी करणारी न्यायालयाने फेटाळली आहे.

    कथित मुलीनं केली याचिका

    अपर्णा ठाकूर नावाच्या महिलेनं रवि किशन हे तिचे पती असल्याचं आणि त्या दोघांना एक मुलगी असल्याचा दाव केला होता. शिनोव ही रवि किशची मुलगी असल्याचं सांगत तिने रवि किशन याच्या डिएनए चाचणी करण्याची मागणी केली. शिनोवाने मुंबईतील गोरेगाव-दिंडोशी कोर्टात याचिका दाखल केली होती. यामध्ये तिने रवी किशन हे वडील आहेत की नाही यासाठी डीएनए चाचणी करण्याची मागणी केली होती. त्याचप्रमाणे तिने कोर्टात याचिका दाखल करत तिला अधिकृतरित्या रवी किशन यांच्या मुलगी म्हणून स्वीकारण्यात यावं अशी देखील मागणी केली.  या याचिकेवर न्यायालयाे निकाल देताना शिनोवाची याचिका फेटाळून लावली आहे.

    याचिकेत कोणत्या मागण्या?

    रवि किशन यांनी शिनोवला मुलगी म्हणून स्विकारावं आणि तिला मुलीचे सगळे अधिकार द्यावेत ही मागणी तिने पुर्वीहीि केली होती. रवि किशन यांनी हे आधिच नाकारलं होत. त्यानंतर  शिनोवने ती रवी किशन यांची बायोलॉजिकल मुलगी असल्याचं घोषित करण्यात यावं अशी मागणी केली होती. तिला आपली मुलगी म्हणून स्वीकारण्यास नकार दिला नाही याची खात्री करण्यासाठी, न्यायालयाने देखील एक आदेश (आदेश) जारी केला पाहिजे.याशिवाय, त्यांनी अपर्णा सोनी उर्फ ​​अपर्णा ठाकूर आणि इतरांविरुद्ध उत्तर प्रदेशात दाखल केलेला एफआयआर रद्द करण्याची मागणी केली आहे आणि मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे.