Sussanne Khan_

अभिनेता ह्रतिक रोशनची पत्नी सुझेन खानसह क्रिकेटर सुरेश रैना यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मुंबईमधील ड्रॅगनफ्लाय क्लबवर पोलिसांनी छापा टाकला असता ही कारवाई करण्यात आली आहे. मुंबई विमानतळाजवळ असणाऱ्या या क्लबमध्ये सुरेश रैना आणि सुझेन खान होते. त्यांच्यासह इतर सेलेब्रेटीही होते. एकूण ३४ जाणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.  

मध्यरात्री २.३० वाजता सहारा पोलिसांनी ही कारवाई केलीये. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “माजी भारतीय क्रिकेटर आणि इतर काही सेलिब्रेटींसोबत एकूण ३४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोनाशी संबधित नियमांचं पालन केल्याने तसंच वेळमर्यादा संपल्यानंतरही क्लब सुरु ठेवण्यात आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे”.

जेडब्ल्यू मॅरियेटस्थित ड्रॅगन फ्लाय क्लबवर डीसीपी जैन, पोलीस इन्सपेक्टर यादव यांच्या टीमने ही कारवाई केली. राज्यात अजूनही लॉकडाऊनचे नियम लागू आहेत, या नियमांनुसार रात्री ११ वाजल्यानंतर कोणत्याही स्वरुपाचे सार्वजनिक कार्यक्रम, पार्टी करण्यास प्रतिबंध आहेत. या पार्टीत सहभागी होण्यासाठी १९ जण दिल्लीहून आल्याचीही माहिती मिळते आहे. इतर काही जण हे पंजाब आणि मुंबईचे रहिवासी आहेत. यातील अनेकांनी मद्यपान केले होते.  पार्टीत ज्यावेळी छापा घालण्यात आला, त्यावेळी क्रिकेटर सुरेश रैना, गायक गुरु रंधावा, ह्रतिक रोशनची घटस्फोटीत पत्नी सुझान खान तिथे उपस्थित असल्याची माहिती आहे. एक मोठा गायक छापेमारी सुरु असताना मागच्या दरवाजातून फरार झाल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे. यात बादशाहाचे नाव समोर येते आहे.

या सेलेब्रेटींबरोबर मुंबई पोलिसांनी क्लबच्या कर्मचाऱ्यांवरही कारवाई केलीये. मुंबईत नाईट कर्फ्यू जाहीर करण्यात आला असतानाच ही कारवाई करण्यात आली आहे. राज्यात मंगळवारी रात्रीपासून ५ जानेवारीपर्यंत महानगरपालिका क्षेत्रात रात्री ११ ते पहाटे ६ पर्यंत संचारबंदी लागू राहील. संचारबंदीच्या निर्णयामुळे सरत्या वर्षांला निरोप आणि नववर्षांच्या स्वागतासाठी ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री होणाऱ्या जल्लोषावर पूर्णपणे निर्बंध आले आहेत.