‘क्रिमिनल जस्टिस’ या वेबसीरिजचा तिसऱ्या सीझनचा टीझर रिलीज

'क्रिमिनल जस्टिस 3'चा एक टीझर याआधीदेखील प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या टीझरमुळे प्रेक्षकांना माधव मिश्राची झलक पाहायला मिळली होती

    ओटीटी विश्वात आवडीने पाहिला जाणारा प्रकार म्हणजे वेबसिरिज आणि त्या अभिनेता पंकज त्रिपाठीची वेबसिरिज असेल तर प्रेक्षकांसाठी ती पर्वणीच असते. अनेक लोकप्रिय वेबसीरिजमध्ये पंकजने काम केलं आहे. पंकजची ‘क्रिमिनल जस्टिस’ (Criminal Justice) ही वेबसीरिज प्रचंड गाजली होती. आता या वेबसीरिजचा तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या सीरिजचा टीझर आऊट झाला आहे.

    ‘क्रिमिनल जस्टिस’ या वेबसीरिजच्या दोन्ही सीझनने चांगलाच धुमाकूळ घातला. या दोन्ही सीझनमध्ये पंकजचा अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. त्यामुळे प्रेक्षक या सीझनच्या तिसऱ्या सीझनची आतुरतेने वाट पाहत होते. आता या सीझनचा तिसरा सीझन आऊट झाला आहे. या सीरिजमध्ये पंकज माधव मिश्राच्या भूमिकेत दिसणार आहे. टीझरमध्ये माधव मिश्रा म्हणत आहे,”विजय नेहमी सत्याचाच होतो”. हा टीझर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.

    डिज्नी प्लस हॉटस्टारवर होणार रिलीज

    ‘क्रिमिनल जस्टिस 3’चा टीझर आऊट झाल्याने प्रेक्षक आता या सीरिजची आतुरतेने वाट पाहत आहेत. सोशल मीडियावरदेखील ही वेबसीरिज चर्चेत आहे. टीझर आऊट झालेला असला तरी ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला कधी येणार हे निर्मात्यांनी जाहीर केलेलं नाही. पुढल्या महिन्यात डिज्नी प्लस हॉटस्टारवर ही वेबसीरिज रिलीज होणार आहे.

    ‘क्रिमिनल जस्टिस 3’चा एक टीझर याआधीदेखील प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या टीझरमुळे प्रेक्षकांना माधव मिश्राची झलक पाहायला मिळली होती. टीझरमध्ये पंकज म्हणजेच माधव म्हणाला होता,माझं नाव माधव मिश्रा आहे आणि मी वकील आहे”. ‘क्रिमिनल जस्टिस 3’ ही सीरिज प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करणार आहे.