boney kapoor

दिग्दर्शक बोनी कपूर यांच्या क्रेडिट कार्डची (Credit Card) गोपनीय माहिती मिळवून सायबर चोरट्यांनी त्यांच्याकडून पावणे चार लाख रुपये लुटले आहेत.

    मुंबई: देशभरात सायबर गुन्हे खूप वाढत आहेत. आजपर्यंत अनेकांना सायबर फसवणुकीचा (Cyber Fraud) फटका बसला आहे. आता बॉलिवूडचे प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक बोनी कपूर (Boney Kapoor) यांची सायबर फसवणूक (Crime) झाल्याचं समोर आलं आहे.

    बोनी कपूर यांच्या क्रेडिट कार्डची (Credit Card) गोपनीय माहिती मिळवून सायबर चोरट्यांनी त्यांच्याकडून पावणे चार लाख रुपये लुटले आहेत. याप्रकरणी आंबोली पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. बोनी कपूर यांच्या बँक खात्यातून ३ लाख ८२ हजार रुपये लंपास करण्यात आले आहेत. या गुन्ह्याचा तपास आंबोली पोलिसांकडून सुरू आहे.

    याआधीही अनेक सेलिब्रिटींना सायबर क्राईमचा फटका बसला आहे. बॉलिवूडपासून ते अगदी मराठी कलाकारांचीही सायबर फसवणूक झाली आहे. अनेकदा सेलिब्रिटींच्या नावाचा गैरवापर करून सर्वसामान्यांकडूनही पैसे उकळले जातात. निया शर्मा, रश्मी देसाई, देवोलिना भट्टाचार्जी यांसारख्या अभिनेत्रींना सायबर क्राईमचा फटका बसला आहे.