झेक प्रजासत्ताकच्या क्रिस्टीना पिझकोवानं जिंकला मिस वर्ल्डचा मुकुट! सिनी शेट्टीला आठव्या स्थानावर मानावं लागलं समाधान

झेक प्रजासत्ताकची सौंदर्यवती क्रिस्टीना पिझकोवा ७१व्या मिस वर्ल्ड स्पर्धेची विजेती ठरली. तिने 112 देशांतील स्पर्धकांना हरवून मिस वर्ल्डचा ताज जिंकला. लेबनॉनची यास्मिना जायतौन ही पहिली उपविजेती ठरली. भारताच्या सिनी शेट्टीला आठव्या स्थानावर समाधान मानावे लागले.

  दरवर्षीप्रमाणे जगभरातील सौंदर्यवतीमधून विश्वसुदंरी निवडण्याची स्पर्धा म्हणजेच मिस वर्ल्ड स्पर्धा शनिवारी थाटामाटत पार पडली. या स्पर्धेत 112 देशांतील स्पर्धकांना मागे टाकत  चेक प्रजासत्ताकची (Czech Republic) सौंदर्यवती क्रिस्टीना पिस्कोव्हा (Krystyna Pyszkova) हिनं 71 वा मिस वर्ल्डचा (Miss World 2024) किताब पटकावला आहे. गतवर्षीची विजेती कॅरोलिना बिएलॉस्का हिने क्रिस्टीनाला मुकुट घालुन दिला. स्पर्धेत लेबनॉनच्या यास्मिना जायतौनला फर्स्ट रनरअपचा ताज मिळाला तर भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या सिनी शेट्टीला (Sinni Shetty) स्पर्धेतील टॉप 4 स्पर्धकांमध्ये स्थान मिळवता आलं नाही.

  फेब्रुवारीपासून नवी दिल्लीत ही स्पर्धा सुरू झाली होती. भारतानं तब्बल अठ्ठावीस वर्षांनी मिस वर्ल्ड सौंदर्य स्पर्धेचं आयोजन केलं. मुंबईतील जिओ सेंटरमध्ये शनिवारी हा रंगारंग सोहळा पार पडला आहे. यावेळी 22 वर्षीय सिनी शेट्टीनं भारताचे प्रतिनिधित्व केलं. तिनं 2022 मध्ये ‘फेमिना मिस इंडिया वर्ल्ड’चा ताज जिंकला. तिनं टॅाप 8 मध्ये स्थान मिळवलं होत. मात्र, मिस वर्ल्ड 2024 स्पर्धेत तिला टॉप 4 मध्ये स्थान मिळवता आलं नाही. मिस वर्ल्डचा मुकुट 24 वर्षीय क्रिस्टीना पिस्कोवानं घेऊन गेली.

  कोण आहे  मिस वर्ल्ड क्रिस्टीना पिस्कोव्हा?

  चेक प्रजासत्ताकची सौंदर्यवती क्रिस्टीना पिस्कोव्हा कायदा आणि व्यवसाय या दोन्ही विषयांमध्ये डिग्री घेत आहे. तिच्या सोशल मीडिया अकांऊटनुसार, तिनं Krystyna Pyszko Foundation ची स्थापना केली. तसचं ती मॉडेलिंगही करते. तिनं टांझानियामध्ये गरीब मुलांसाठी इंग्रजी सुरू केली आहे.

  जज पॅनेलमध्ये ‘या’ सेलेब्रिटिंनी लावली हजेरी

  या कार्यक्रमात 12 जज पॅनेलमध्ये चित्रपट निर्माता साजिद नाडियादवाला, कृती सेनन, पूजा हेगडे, क्रिकेटर हरभजन सिंग यांच्यासह अनेक सेलिब्रिटींचा समावेश होता. सोनी लिव्हवर हा कार्यक्रम लाईव्ह दाखवला जात होता. चित्रपट निर्माता करण जोहर आणि माजी मिस वर्ल्ड मेगन यंग यांनी या कार्यक्रमाचं सुत्रसंचालन केलं होतं. त्याचबरोबर शान, नेहा कक्कर आणि टोनी कक्कर या गायकांनीही उत्तम परफॉर्मन्स दिला.