dagdichawl 2 poster

‘दगडी चाळ २’ (Daagdi Chaawl 2 ) मधील सूर्या म्हणजेच अंकुश चौधरीनंतर (Ankush Chaudhari) प्रेक्षकांसमोर कलरफुल सोनल म्हणजेच पूजा सावंतची (Pooja Sawant) व्यक्तिरेखा समोर आली आहे.

    ‘दगडी चाळ २’ (Daagdi Chaawl 2 ) मध्ये कोण असणार याविषयी खूप उत्सुकता होती. या सिनेमामध्ये कोणते कलाकार असणार हे आता हळुहळू समोर आले आहे.  सूर्या म्हणजेच अंकुश चौधरीनंतर (Ankush Chaudhari) प्रेक्षकांसमोर कलरफुल सोनल म्हणजेच पूजा सावंतची (Pooja Sawant) व्यक्तिरेखा समोर आली आहे. तसेच सूर्या आणि सोनलच्या तरल प्रेमकहाणीच्या वेलीवर आता अंशुमन नावाचे ‘बटरफ्लाय’ बसले आहे. ‘दगडी चाळ २’मध्ये प्रेक्षकांना सूर्या आणि सोनलचा मुलगाही पाहायला मिळणार आहे.

    या चित्रपटाचे नवीन पोस्टर सोशल मीडियावर झळकले असून एक कौटुंबिक कहाणी यात पाहायला मिळणार हे यावरून स्पष्ट होत आहे. मंगलमूर्ती फिल्म्स आणि संगीता अहिर निर्मित, चंद्रकांत कणसे दिग्दर्शित ‘दगडी चाळ २’ येत्या १८ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

    पोस्टरमध्ये सोनल सूर्याला मिठी मारून ‘आय लव्ह यू हबी’ म्हणत आहे . तर आणखी एका पोस्टरमध्ये अंशुमनही सूर्याला बिलगून ‘आय लव्ह यू डॅडी’ म्हणताना दिसत आहे. हे सुखी कुटुंब पाहता आता सूर्याने ‘डॅडीं’ची साथ सोडली की, अजूनही सूर्या ‘डॅडीं’चा उजवा हात आहे? या प्रश्नांची उत्तरे ‘दगडी चाळ २’ पाहिल्यावरच समजतील.

    मकरंद देशपांडे, अंकुश चौधरी आणि पूजा सावंत यांच्या व्यक्तिरेखा समोर आल्यामुळे प्रेक्षकांना या चित्रपटाविषयी उत्सुकता आहे.