
नुकत्याच पार पडलेल्या दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय महोत्सवात ‘द काश्मीर फाईल्स’ला ‘बेस्ट फिल्म’चा पुरस्कार मिळवला. दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी पुरस्कार स्वीकारताना म्हटले की “आयोजकांचे आभार. अनेक जणांनी एकत्र येत हा सिनेमा बनवला आहे. त्यामुळे हा लोकांचा सिनेमा आहे. मी हा पुरस्कार त्या सर्व दहशतवाद पीडितांना आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्या सगळ्या भारतीयांना समर्पित करतो.”
मुंबई: दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (Dadasaheb Phalke Award 2023) काल 20 फेब्रुवारी रोजी मुंबईत आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात सिनेसृष्टीतील अनेक कलाकार उपस्थित होते. सिनेसृष्टीतील अत्यंत महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या या पुरस्कार सोहळ्यात ‘द काश्मीर फाईल्स’(The Kashim Files) सिनेमाने बाजी मारली. ‘द काश्मीर फाईल्स’ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा(Best Film) पुरस्कार मिळाला आहे. आलिया भट्टला(Alia Bhatt) ‘गंगुबाई काठियावाडी’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा (Best Actress) तर रणबीर कपूरला ‘ब्रह्मास्त्र’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा (Best Actor) पुस्कार देण्यात आला.
दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला असून त्यांनीच निर्मितीही केली आहे. या सिनेमावरुन मोठा वादही झाला. सिनेमा राजकीय प्रोपगांडा असल्याचे अनेकांनी म्हटले होते. मात्र सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. चित्रपटाला अनेक पुरस्कारही मिळाले. नुकत्याच पार पडलेल्या दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय महोत्सवात ‘द काश्मीर फाईल्स’ला ‘बेस्ट फिल्म’चा पुरस्कार मिळवला. दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी पुरस्कार स्वीकारताना म्हटले की “आयोजकांचे आभार. अनेक जणांनी एकत्र येत हा सिनेमा बनवला आहे. त्यामुळे हा लोकांचा सिनेमा आहे. मी हा पुरस्कार त्या सर्व दहशतवाद पीडितांना आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्या सगळ्या भारतीयांना समर्पित करतो.”
ANNOUNCEMENT:#TheKashmirFiles wins the ‘Best Film’ award at #DadaSahebPhalkeAwards2023.
“This award is dedicated to all the victims of terrorism and to all the people of India for your blessings.” pic.twitter.com/MdwikOiL44— Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) February 21, 2023
यावेळी अनुपम खेर यांना ‘मोस्ट व्हर्सेटाइल ॲक्टर’ म्हणून पुरस्कार मिळाला. सर्वांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे अभिनंदन केले. यावेळी ते म्हणाले, “हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी आभार मानतो.तुम्ही कुठेही असलात तरी स्वप्न पाहणं खूप महत्वाचं आहे. कारण हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही मेहनत करता आणि माझ्या मते स्वप्नं एक ना एक दिवस पूर्णही होतात.”
View this post on Instagram
दादासाहेब फाळके चित्रपट महोत्सवात प्रदान करण्यात आलेल्या पुरस्कारांची यादी :
- आरआरआर- फिल्म ऑफ द ईयर
- द कश्मीर फाइल्स– बेस्ट फिल्म
- आलिया भट्ट– बेस्ट ॲक्ट्रेस (गंगूबाई काठियावाड़ी)
- रणबीर कपूर- बेस्ट ॲक्टर (ब्रह्मास्त्र पार्ट 1)
- वरुण धवन- बेस्ट ॲक्टर क्रिटिक्स (भेड़िया)
- ऋषभ शेट्टी – बेस्ट प्रॉमेसिंग ॲक्टर (कांतारा)
- अनुपम खेर – मोस्ट वर्सेटाइल ॲक्टर (द कश्मीर फाइल्स)
- रुद्र: द एज ऑफ डार्कनेस – बेस्ट वेब सीरीज
- अनुपमा – टीवी सीरीज ऑफ द इयर
- तेजस्वी प्रकाश – बेस्ट टीव्ही ॲक्ट्रेस (नागिन 6)
- जैन इमाम– बेस्ट टीव्ही ॲक्टर (फना-इश्क में मरजावा)
- सचेत टंडन – बेस्ट मेल सिंगर (मय्या मेनू)
- नीती मोहन – बेस्ट फिमेल सिंगर ( मेरी जान)
- पीएस विनोद – बेस्ट सिनेमॅटोग्राफी (विक्रम वेधा)
- रेखा – आउटस्टँडिंग कॉन्ट्रीब्युशन इन द फिल्म इंडस्ट्री