
अभिनेता प्रकाश राज यांना जीवे मारण्याची धमकी देणारा व्हिडिओ दाखवल्याप्रकरणी एका यूट्यूब चॅनलविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अभिनेते प्रकाश राज (Actor Prakash Raj) हे कायम वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतात. राजकीय आणि सामाजिक विषयांवर ते परखडपणे आपली मतं मांडत असतात. कधी ते आपल्या पात्रांमुळे चर्चेत असतात तर कधी स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत असतात.
प्रकाश राज यांनी नुकतेच सनातन धर्माविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. या वक्तव्यामुळे त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. प्रकाश राज यांना सोशल मीडियावरही जोरदार ट्रोल केले जात आहे. त्यानंतर आता त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या धमकीनंतर प्रकाश राज यांनी एका यूट्यूब चॅनलविरोधात बंगळुरू पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
अभिनेता प्रकाश राज यांना जीवे मारण्याची धमकी देणारा व्हिडिओ दाखवल्याप्रकरणी एका यूट्यूब चॅनलविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकाश राज यांनी बंगळुरू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पण या प्रकरणी पोलिसांनी उशिरा गुन्हा दाखल करून घेतला. याप्रकरणी बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला.
डीसीपींनी सांगितले की, प्रकाश राज यांनी दोन दिवसांपूर्वी अशोक नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. आम्ही गुन्हा दाखल केला असून आमचा तपास सुरू आहे.
दरम्यान, प्रकाश राज यांना दिलेल्या धमकीचा व्हिडिओ ज्या यूट्युब चॅनेलने दाखवला होतो त्या व्हिडिओला खूप व्ह्यूज मिळाले आहेत. प्रकाश राज यांनी दावा केला आहे की, टीव्ही विक्रम वाहिनीच्या या व्हिडिओमध्ये त्याचे आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांचे नकारात्मक चित्रण करण्यात आले आहे. त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी कलम 506 आणि 505 (2) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.