Romantic December

रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या झी युवा या वाहिनीने अगदी कमी वेळातच प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. या वाहिनीवरील मालिकांनी प्रेक्षकांना त्यांच्या टेलिव्हिजन स्क्रीनला खिळवून ठेवलं आहे. आता प्रेक्षकांना या आठवड्यात झी युवावर रोमँटिक डिसेंबर स्पेशल सप्ताह पाहायला मिळणार आहे. गुलाबी थंडी हि वातावरणात प्रेम पसरवण्यासाठी पूरक असते आणि तसंच काहीसं प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे झी युवावरील डॉक्टर डॉन आणि ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण या मालिकेत.

View this post on Instagram

A post shared by Zee Yuva (@zeeyuva)

डॉक्टर डॉन मध्ये राधाच्या प्रेमासाठी देवा डॉलीबाईंपासून दूर जायचं ठरवतो पण डॉलीबाई मात्र हार मनात नाहीत आणि देवाचा सहवास मिळवण्यासाठी त्या शर्थीचे प्रयत्न करताना दिसत आहेत. आता डॉलीबाई देवाला एका कामासाठी स्वतःसोबत गाडीतुन घेऊन जातात आणि त्यांच्या या लॉंग ड्राइव्हमध्ये त्यांच्यात गोष्टी सुरळीत होणार का हे प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळेल.

View this post on Instagram

A post shared by Zee Yuva (@zeeyuva)

तसेच ऑलमोस्ट सुफळ संपूर्णमध्ये नचिकेत अप्पांना सईला परत मिळवण्याचं आव्हान देतो आणि तो सईला एका रोमँटिक डेटवर घेऊन जातो. तिथे तो सईला अंगठी देऊन तिच्यावर असलेलं त्याचं प्रेम पुन्हा एकदा तिच्यासमोर व्यक्त करतो. तसंच सई नचिकेतच्या वाढदिवसानिमित्त त्याच्यासाठी खास सरप्राईज प्लॅन करते ज्याने नचिकेत खूप खुश होतो पण या आनंदात अप्पा काय विघ्न आणणार? हे प्रेक्षकांना लवकरच पाहायला मिळेल. त्यामुळे पाहायला विसरू नका रोमँटिक डिसेंबर फक्त झी युवावर.

View this post on Instagram

A post shared by Zee Yuva (@zeeyuva)