शेतात केलेली प्रॅक्टिस ते ‘महाराष्ट्राज बेस्ट डान्सर’चा मंच, दीपक हुलसुरेचा हरखून टाकणार प्रवास!

'महाराष्ट्राज बेस्ट डान्सर'च्या मंचावर प्रेक्षकांना नृत्याचे विविध अविष्कार पाहायला मिळताहेत . महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेल्या स्पर्धकांनी आपल्या कलेचं उत्तम प्रदर्शन केलं आहे. या सर्व स्पार्धकांमध्ये प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधलं आहे ते लातूरच्या दीपक हुलसुरे यानं. लातूरच्या एका गावात राहणाऱ्या दीपकला नृत्याची आवड आधीपासून होती, पण गावात कोणी गुरू नसल्यानं यूट्यूबवर व्हिडिओ पाहून त्यानं  डान्सला सुरुवात केली. ज्या शेतात दीपक काम करायचा, तिथंच तो  रियाज/सराव करू लागला.

‘महाराष्ट्राज बेस्ट डान्सर’च्या मंचावर प्रेक्षकांना नृत्याचे विविध अविष्कार पाहायला मिळताहेत . महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेल्या स्पर्धकांनी आपल्या कलेचं उत्तम प्रदर्शन केलं आहे. या सर्व स्पार्धकांमध्ये प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधलं आहे ते लातूरच्या दीपक हुलसुरे यानं. लातूरच्या एका गावात राहणाऱ्या दीपकला नृत्याची आवड आधीपासून होती, पण गावात कोणी गुरू नसल्यानं यूट्यूबवर व्हिडिओ पाहून त्यानं  डान्सला सुरुवात केली. ज्या शेतात दीपक काम करायचा, तिथंच तो  रियाज/सराव करू लागला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sony मराठी (@sonymarathi)

‘महाराष्ट्राज बेस्ट डान्सर’च्या मंचामुळे दीपकला भारतसारखा गुरू मिळाला आणि त्याची कला अजून बहरू लागली. मेहनत आणि जिद्द यांमुळे काहीही साध्य करता येतं, हे दीपकनं सगळ्यांना दाखवून दिलं आहे. स्वतःचं डान्स स्कूल सुरू  करायचं असं दीपकचं स्वप्न आहे आणि तो जेव्हा डान्स स्कूल सुरू करेल, तेव्हा धर्मेश सर त्याच्या डान्स स्कूलमध्ये शिकवतील, असा त्यांनी दीपकला शब्द दिला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sony मराठी (@sonymarathi)

धर्मेश सरांनी तर दीपकला डान्सचा लातूर पॅटर्न हे नावही दिलं आहे. दीपक दिवसेंदिवस आपल्या नृत्यानं प्रेक्षक आणि परीक्षक यांची मनं जिंकतो आहे. पाहा, ‘महाराष्ट्राज बेस्ट डान्सर’ सोम.-मंगळ., रात्री 9 वा. फक्त सोनी मराठी वाहिनीवर.