आशियातील पॉवर कपल्सच्या यादीत झळकले दीपिका – रणवीर

आशियातील पॉवर कपल्सच्या (Richest Power Couples In Asia) यादीत बॉलिवूडच्या कपल्सनाही स्थान देण्यात आले आहे. चीनच्या साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने २०२२ ची आशिया खंडातील पॉवर कपल्सची यादी तयार केली आहे. या पॉवर कपल्सच्या यादीमध्ये दिपीका (Deepika)आणि रणवीर (Ranveer) हे चौथ्या क्रमांकावर आहेत.

    अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) ही बॉलिवूडमधली लोकप्रिय जोडी आहे. या दोघांचे लाखो चाहते आहेत. या दोघांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आता हे दोघं फक्त बॉलिवूडच्या (Bollywood) पॉवर कपल्सपैकी एक नाही तर आशियातील पॉवर (Richest Power Couples In Asia) कपल्सपैकी एक आहेत.

    अलिकडेच आशियातील पॉवर कपल्सच्या यादीत बॉलिवूडच्या कपल्सनाही स्थान देण्यात आले आहे. चीनच्या साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने २०२२ ची आशिया खंडातील पॉवर कपल्सची यादी तयार केली आहे. या पॉवर कपल्सच्या यादीमध्ये दिपीका आणि रणवीर हे चौथ्या क्रमांकावर आहेत. हाँगकाँगचे अभिनेते टोनी लेउंग आणि करीना ल्यू, दक्षिण कोरियाचे सुपरस्टार रेन आणि किम ताए ही आणि सिंगापूरचे फॅन वोंग आणि क्रिस्टोफर ली पहिल्या तीन क्रमांकावर आहेत. दीपिका-रणवीरपूर्वी बॉलिवूडची कोणतीही जोडी या यादीत स्थान मिळवू शकली नाही.

    या अहवालानुसार, २०१८ मध्ये लग्न झालेल्या दीपिका आणि रणवीर यांनी चित्रपट आणि जाहिरातींमधून कमाई केली. २०२२ मध्ये, दोघांची एकूण संपत्ती ही १ हजार २३७ कोटी रुपये आहे. दीपिकाची एकूण संपत्ती ही ३१३ कोटी रुपयांची आहे, तर रणवीरची ४४५ कोटींची संपत्ती आहे. यापूर्वी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ह्युमन ब्रँड्सने दिलेल्या वृत्ताने दीपिका-रणवीरला बॉलीवूडमधील सर्वात पॉवरफुल कपल म्हटलं आहे.