
ये मेरा खाना चुराते है..., असे दीपिका भर पत्रकार परिषदेत म्हणते. तिचे ते शब्द ऐकून अमिताभ क्षणभर स्तब्ध होतात समोर बसलेले सर्व लोक मात्र दीपिकाचा हा आरोप ऐकून हसू लागतात. मग मात्र अमिताभही दीपिकाची मजा घेतात.
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि दीपिका पादुकोण यांचा पीकू हा सिनेमा खूप गाजला. आगळीवेगळी कथा आणि दोघांचाही शानदार अभिनय पाहून प्रेक्षक भारावले होते. सध्या ‘पीकू’च्या रिलीजदरम्यानचा एक जूना व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. या व्हिडीओत दीपिका अमिताभ बच्चन यांच्यावर एक आरोप करताना दिसतेय. अमिताभ बच्चन माझे जेवण चोरतात, असे दीपिका या व्हिडीओत म्हणतेय. दीपिकाच वक्तव्य ऐकल्यावर काहीक्षण शांत झाले सगळे पण नंतर एकच हशा पिकला.
View this post on Instagram
ये मेरा खाना चुराते है…, असे दीपिका भर पत्रकार परिषदेत म्हणते. तिचे ते शब्द ऐकून अमिताभ क्षणभर स्तब्ध होतात समोर बसलेले सर्व लोक मात्र दीपिकाचा हा आरोप ऐकून हसू लागतात. मग मात्र अमिताभही दीपिकाची मजा घेतात.
यावर अमिताभ म्हणतात, आम्ही सामान्यपणे तीन वेळा जेवणारे लोक आहोत. ही दर तीन मिनिटाला खात असते. आश्चर्य म्हणजे, दर तीन मिनिटाला खात असूनही ते जाते कुठे? मला जाणून घ्यायचे आहे. ही इतकी सडपातळ कशी?’, असे अमिताभ म्हणतात. अमिताभ यांचे हे शब्द ऐकून दीपिकाला हसू आवरत नाही.
हा मजेदार व्हिडीओ दीपिकाच्या एका फॅन पेजवर शेअर करण्यात आला आहे. सध्या या व्हिडीओची जोरदार चर्चा आहे.